vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

नवी दिल्ली प्रतिनिधी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला आपल्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपतींनी एका संदेशात म्हटले आहे की, “दुर्गापूजेच्या शुभ प्रसंगी, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांचे मी हार्दिक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते.

दुर्गापूजेचा पवित्र सण आपली संस्कृती, श्रद्धा आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. दुर्गामातेची तिच्या नऊ रूपांमध्ये पूजा करणे हा केवळ आध्यात्मिक शुद्धीचा मार्ग नाही तर सत्य, न्याय आणि करुणेसह पुढे जाण्यासाठी प्रेरणा देखील देतो. हा सण समता, सहिष्णुता आणि प्रेमाच्या भावनेला प्रोत्साहन देतो.

या पवित्र प्रसंगी, महिलांचा आदर करण्यासाठी आणि समाजात त्यांचे योग्य स्थान कायम राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा आपण घेऊया . मी दुर्गामातेकडे सर्वांना बुद्धी आणि धैर्य प्रदान करण्यासाठी आणि सर्वांना आनंद आणि समृद्धी लाभावी यासाठी प्रार्थना करते ”.

000000

संबंधित पोस्ट

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

१८ डिसेंबरपासून #माळेगाव यात्रेला सुरुवात भव्य कार्यक्रमांचे आयोजन; भाविकांसाठी सर्वांगीण सुविधा मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची माहिती..

vishwatmaklokswamivarta

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार लयलूट …

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम