vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

मुंबई महापालिका निवडणुक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर-मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज, आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव…

[मुंबई प्रतिनिधी: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत आज वांद्रे येथे जाहीर करण्यात आले आहे. आजच्या आरक्षण सोडतीत मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय महिला आणि महिला खुला प्रवर्ग अशा एकूण 114 जागा आहेत.

 

राजकीय पक्षांसाठी अस्मितेचा विषय :प्रभाग क्रमांक 1 हा ओबीसी महिला राखीव झाला असून, प्रभाग क्रमांक 2 हा सामान्य महिला प्रवर्गासाठी, प्रभाग क्रमांक 3 हा सामान्य प्रवर्गासाठी आणि प्रभाग क्रमांक 26 हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. तसंच मध्य मुंबईतील अनेक प्रभाग ओबीसी महिलासाठी राखीव झाला असून, दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये सामान्य प्रवर्गातील महिलांना अधिक जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात प्रभावशाली महानगरपालिकांपैकी एक आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. अनेक राजकीय पक्षांसाठी तर मुंबई महानगरपालिका अस्मितेचा विषय आहे. त्यामुळं आरक्षण यादी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.

मुंबई महानगरपालिकेत दिसणार महिला राज , आज आरक्षण सोडतील ओबीसी प्रवर्गासाठी तब्बल 61 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर, दुसरीकडे महिलांना दिलेले 50 टक्के आरक्षण देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्णय टप्पा ठरू शकत अशी शक्यता वर्तवली जात आहे. दक्षिण मुंबई, अंधेरी, दहिसर आणि घाटकोपर सारख्या भागात बहुतांश प्रभाग ओबीसी आणि सामान्य महिलांसाठी राखीव झाल्यानं यावर्षी मुंबई महानगरपालिकेत महिलाराज दिसेल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

: 227 प्रभागातून राखीव झालेले प्रभाग,अनुसूचित जाती

151, 186, 146, 152, 155, 147, 189, 93,118, 183, 215, 141, 133, 26, 140

अनुसूचित जाती महिला आरक्षण

133, 183, 147, 186, 155, 118, 151, 189..

अनुसूचित जमाती आरक्षित

53, 121

अनुसूचित जमाती महिला

121: एकूण सदस्यसंख्या 227

महिलांसाठी राखीव 114अनुसुचित जातींसाठी राखीव वॉर्ड- 15 महिला 8अनुसुचित जमाती एकूण राखीव -2 महिला एक ओबीसी राखीव 61 महिला 31 सर्वसाधारण वॉर्ड 149 महिला राखीव 74

मुंबई महापालिकेतील अनुसूचित जमाती करिता आरक्षित प्रभाग कोणते?

प्रभाग क्रमांक -५३ प्रभाग क्रमांक – १२१

मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जातीकरिता आरक्षित 15 वॉर्ड कोणते? प्रभाग क्रमांक खालील प्रमाणे -(महिला आरक्षण धरून)

प्रभाग क्रमांक -२६ प्रभाग क्रमांक -९३ प्रभाग क्रमांक -१५१ प्रभाग क्रमांक -१८६ प्रभाग क्रमांक -१४६ प्रभाग क्रमांक -१५२ प्रभाग क्रमांक -१५५ प्रभाग क्रमांक -१४

प्रभाग क्रमांक -१८९ प्रभाग क्रमांक -११८

प्रभाग क्रमांक -१८३प्रभाग क्रमांक -२१५

प्रभाग क्रमांक -१४१ प्रभाग क्रमांक -१३३ प्रभाग क्रमांक -१४०

मुंबईतील कोणते वॉर्ड महिलांसाठी आरक्षित?अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड- 133, 183, 147,186,155,118,151,189अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव वॉर्ड- 121

28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार :आज आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता 20 नोव्हेंबरपर्यंत सर्व राजकीय पक्षांना आणि इच्छुकांना याबाबत काही हरकती असल्यास, त्या मागवल्या जाणार आहेत. त्यानंतर 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत हरकतींवर प्रशासकीय सुनावणी होईल. त्यानंतर 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. राजकीय पक्षांसाठी ही आरक्षण यादी जागावाटप आणि उमेदवार निवडीमध्ये निर्णायक भूमिका बजावते. दरम्यान, “2025 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीचे आज जाहीर झालेले आरक्षण महिला आणि मागासवर्गीयांचा महापालिकेच्या कारभारात सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वाचं मानलं जात आहे

संबंधित पोस्ट

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

मुंबई उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती व न्यायमूर्ती मंडळ यांनी व्यक्त केल्या अहमदाबाद विमान दुर्घटनाप्रकरणी संवेदना…

vishwatmaklokswamivarta

आगामी कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी-प्रतिबंधात्मक आदेश जारी

मुंबई महानगरपालिके चे आवाहन- पाइपलाइन कामासाठी- 30 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. बुधवार, 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता शटडाउन सुरू होईल आणि गुरुवार, 6 फेब्रुवारी, 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी-उपमुख्यमंत्री यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान- उपमुख्यमंत्री अजित पवार