vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

 

         राज्य प्रतिनिधी   भंडारा-गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाच्या सुधारित आखणीस आणि हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या प्रकल्पामुळे भंडारा ते गडचिरोली प्रवासाचे अंतर २३ किलोमीटरने कमी होईल आणि प्रवासाचा कालावधी सव्वा तासावर येईल.

   नागपूर मुंबई दरम्यानचे प्रवास अंतर आणि कालावधी कमी करण्यासाठी हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग पूर्ण करण्यात आला आहे. विदर्भातील रस्ते वाहतुकीचे जाळे भक्कम करण्यासाठी भंडारा – गडचिरोली प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीस दि.२७ डिसेंबर, २०२३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. आता या महामार्गांतर्गत नागपूर गोंदिया प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाच्या सावरखंडा इंटरचेंजपासून राज्य महामार्ग ५३ वरील कोकणागडपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे आणि बोरगाव इंटरचेंज ते राज्य महामार्ग ३५३ ड वरील रणमोचनपर्यंत प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग बांधणे अशा एकूण ९४.२४१ किलोमीटरच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली.

हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात आली. प्रकल्पासाठी भूसंपादनाची कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यापोटी ५३४.४६ कोटी आणि व्याजापोटी ३९६.६९ कोटी असे एकूण ९३१.१५ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आआली.

00000

 

संबंधित पोस्ट

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

सांगली जिल्ह्यातील 31 बालके ह्रदय शस्ञक्रियेसाठी मुंबईला रवाना- “सेवा पंधरवडा” अंतर्गत उपक्रम

vishwatmaklokswamivarta

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्यातील दिवाळी:-शिवकालीन वारसा, कोकणी परंपरा आणि खाद्य संस्कृतीचा उत्सव…

vishwatmaklokswamivarta

तीर्थक्षेत्र, देवता, संत, अभंग व पवित्र वारी यांचा अवमान सहन करणार नाही !वारीत नास्तिकतावाद व अर्बन नक्षलवादाचा अजेंडा राबवणार्‍यांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे ! – समस्त वारकरी संप्रदाय व संघटना

vishwatmaklokswamivarta