vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरशिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरशिवस्मारक आणि शिवमुद्रा उभारणार- सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार

            मुंबई, प्रतिनिधी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत सिडकोमार्फत कार्यवाही करण्यात यावी असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अड. आशिष शेलार यांनी दिले.

 मंत्रालयामध्ये अटलसेतुजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत आयोजित बैठकीत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ.किरण कुलकर्णी, नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, सिडको आणि ‘एमएमआरडीए’चे अधिकारी उपस्थित होते.

   सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या सांस्कृतिक वारशाची माहिती सर्वत्र पोहोचविण्यासाठी नियोजन करावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या राजधानीच्या जिल्ह्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जगभरातील पर्यटक येतील, त्यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीची माहिती होण्यासाठी अटल सेतूजवळ शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याबाबत निधीचा प्रस्ताव तयार करावा. सिडकोने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करून मान्यता घेवून या कामाला गती द्यावी. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी व विभागांनी शिवस्मारक व शिवमुद्रा उभारण्याच्या अनुषंगाने विविध परवाने त्वरित प्राप्त करुन घ्याव्यात, असे निर्देशही ॲड. शेलार यांनी दिले.

00000

 

संबंधित पोस्ट

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

महिला सुरक्षितता सर्व्हेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

बातमी प्रसिद्धीचा राग मनात धरुन पत्रकार विष्णु कदम यास मारहाण करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीसीएमची मागणी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ई-क्युजे ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण,सहकार विभागाची अर्धन्यायिक निर्णय प्रक्रिया आता आणखी जलद- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस