vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमागील ७ दिवसांत १७,१२० आयुष्मान कार्ड व १,२९३ वय वंदना कार्ड लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण

बुलढाणा प्रतिनिधी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड तसेच ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या आयुष्मान वय वंदना कार्ड ई-केवायसी मोहिमेला जिल्ह्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मागील सात दिवसांत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत १७ हजार १२० लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात आली असून, आयुष्मान वय वंदना कार्डसाठी १ हजार २९३ ज्येष्ठ नागरिकांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे तसेच कुटुंबातील सर्व पात्र सदस्यांचे आयुष्मान भारत कार्ड आणि वय वंदना कार्ड तातडीने तयार करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

आयुष्मान कार्ड किंवा वय वंदना कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, आयुष्मान आरोग्य मंदिर तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) येथे संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत असून विविध विभागांच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी या संधीचा लाभ घेत आपल्या कुटुंबाचे आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड त्वरित तयार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta

पर्यटन वृद्धीसाठी महिला केंद्रीत ‘आई’ धोरण

vishwatmaklokswamivarta

पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय-पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिताजिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न..

राज्यात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये १६ जून रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’आदिवासी विकास विभागाचा अभिनव उपक्रम – मंत्री डॉ. अशोक वुईके आश्रमशाळांमधील शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी बहुआयामी प्रयत्न

विशेष लेख-हिंद दी चादर ; गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व…

vishwatmaklokswamivarta