vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सुपा MIDC मध्ये उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही ! औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण व सुरक्षितता जपण्यास शासन कटिबद्ध ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुपा MIDC मध्ये उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही ! औद्योगिक विकासासाठी पोषक वातावरण व सुरक्षितता जपण्यास शासन कटिबद्ध ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी-सुपा (ता. पारनेर) एमआयडीसी येथे ‘तौरल इंडिया’च्या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

औद्योगिक वसाहतीत शांतता व सुव्यवस्था राखणे हे शासनाचे प्राधान्य आहे. स्थानिक पातळीवर उद्योजकांना त्रास देणाऱ्या किंवा विकासात बाधा आणणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले आहेत. सुपा एमआयडीसीमध्ये उद्योगांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळेल, याची ग्वाही आम्ही देतो.

उद्योगांच्या कामकाजात काही त्रुटी आढळल्यास त्यावर कार्यवाही करण्यासाठी शासकीय नियमन यंत्रणा‌ सक्षम आहेत. त्यामुळे कोणत्याही खासगी व्यक्तीने किंवा गटाने कायदा हातात घेऊन उद्योजकांना धमकावणे खपवून घेतले जाणार नाही.

उद्योगांसाठी ‘Cost of Doing Business’ कमी करण्यावर आमचा भर आहे. पुढील ५ वर्षांत औद्योगिक विजेचे दर स्थिर राहतील आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी कसा होईल, यादृष्टीने शासनाचे नियोजन सुरू आहे.

महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी हे सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

000000

संबंधित पोस्ट

मुद्रांकाचे अतिरीक्त शुल्क आकारल्यास तक्रार करावी

vishwatmaklokswamivarta

नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांवर अन्‍याय करणारे शासन निर्णय रद्द करा ,मार्च महिन्‍याचे वेतन तात्‍काळ करा-सोमवारी विमाशि संघाचे धरणे / निदर्शने आंदोलन

सायप्रस आणि भारतामधील आर्थिक आणि धोरणात्मक संबंध आता एका नवीन टप्प्यावर आले आहे. भारताचे आर्थिक सामर्थ्य, नाविन्यता आणि जागतिक अर्थव्यवस्थेतील वाढत्या भूमिका प्रशासनीय आहे, असे गौरवोद्गार सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स 00000

मुसळधार पावसाचा इशारा!-पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये व मुंबई उपनगरासह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज – हवामान विभाग

vishwatmaklokswamivarta

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ