vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

बुलढाणा द प्रतिनिधी): सन 2025-26 मधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरी (कुपनलिका) खोदण्याच्या कामांना जिल्हाधिकारी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषद बुलढाणाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सादर केलेल्या प्रस्तावांना तसेच तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि भूवैज्ञानिकांच्या शिफारशींना मान्यता देत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंजूर गावांमध्ये गुगळी, सिंदखेड, तळणी, पोखरी, पिंपळगावदेवी, तपोवन, पुन्हई, लपाली, खरबडी, गिरोली, इसलवाडी, शेलापूर खुर्द, पिंपळगावनाथ, चिचखेडनाथ आणि काळेगाव यांचा समावेश आहे. या गावांमध्ये लोकसंख्या व पाणीटंचाईची तीव्रता विचारात घेऊन एकूण 20 विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये लपाली येथे 3, सिंदखेड, पिंपळगावदेवी आणि तपोवन येथे प्रत्येकी 2 तर उर्वरित गावांमध्ये प्रत्येकी 1 विंधण विहीर मंजूर करण्यात आली आहे.

शासनाच्या 3 फेब्रुवारी 1999 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कामे तातडीने पूर्ण करण्याची जबाबदारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आली आहे. विंधण विहिरींची कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होत असल्यास टँकरद्वारे किंवा खाजगी विहिरी अधिग्रहणाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

कामे सुरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर पंचनामा करणे, भू-टॅगिंगद्वारे छायाचित्रे नोंदविणे, खाजगी जागेवर काम असल्यास नियमानुसार दानपत्र घेणे तसेच गुणवत्तेची खात्री झाल्यानंतरच देयके अदा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय नादुरुस्त हातपंपांची दुरुस्ती करूनही गरज असल्यासच नवीन विंधण विहिरी खोदण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंजूर सर्व कामे 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करणे आवश्यक असून, मुदतीत पूर्ण न झालेल्या उपाययोजनांची मंजुरी शासनाने मुदतवाढ न दिल्यास आपोआप रद्द होणार आहे. या उपाययोजनांमुळे मोताळा तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

00000

संबंधित पोस्ट

अर्ज द्या कर्ज घ्या’ उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी 

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असतांना बेस्ट बसमधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!नवीन गाड्यांवर सुधारित सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे सुराज्य अभियानाला आश्वासन!

महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश!**बंदी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार ?* – रमेश शिंदे

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे