शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा चक्का जाम आंदोलनास प्रचंड प्रतिसाद सुमारे दीड तास वाहतुक कोलमडली : दुरदुरपर्यंत वाहनांच्या रांगा…
जालना, (प्रतिनिधी)- निवडणुकीपुर्वी सत्ताधारी पक्षाने राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली. परंतु निवडणुकीनंतर सत्ता प्राप्त होताच या सर्वसामान्य नागरिक व शेतकर्यांना दिलेल्या आश्वासनांकडे त्यांनी स्पशेल पाठ फिरवल्याने आता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आश्वासनांबाबत `क्या हुआ तेरा वादा’ अशी आंदोलनांची शृंखला उभी करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आज १२ जुन रोजी याच आंदोलनाच्या शृंखलेतील जिल्हास्तरीय चक्का जाम आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर करण्यात आले.यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे,उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, रमेश गव्हाड, भगवानराव कदम, मुरलीधर शेजुळ,हनुमान धांडे, माजी जि.प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे भरत सांबरे, गणेश काळे,तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण,वैâलास पुंगळे, कुंडलिक मुठ्ठे, देवनाथ जाधव, मुरलीधर थेटे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले,दुर्गेश काठोठीवाले, महिला आघाडीच्या मंगलमेटकर, दिपक रणनवरे, बबनराव खरात, रविकांत जगधने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, राज्यातीलशेतकरी, कष्टकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. याला शासनाने धोरणं जबाबदारअसून निवडणुक काळात शेतकरी बंधू-भगिनींना मोठ-मोठी आश्वासने देण्यात आली.त्यांची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे क्या हुआ तेरा वादा याआंदोलनांच्या माध्यमातून शासनाला जाब विचारत आहोत. सध्याचे सरकार हे उद्योगपतींना धार्जिन आहे. वेळवेगळ्या संस्थांनी केलेल्या सर्व्हेेक्षणतदेशात उत्तर प्रदेश, बिहार यापेक्षाही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबीचे प्रमाण जास्त आहे. शेतकर्यांच्या देशात होणार्या एकुणआत्महतेपैकी ३९ टक्के आत्महत्या या केवळ महाराष्ट्रातील असल्याचे अंबेकर म्हणाले. शेतकर्यांची उत्पादकता वाढविणे, त्यांच्या मालाला योग्य भाव देणे, कापूस, सोयाबीन यांना मागील दहा वर्षांपासून कोणताही भाव वाढ केलीनाही. तेच भाव आजही कायम आहेत. आयात निर्यातीचा फटकाही शेतकर्यांना बसतआहे. त्यामुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होते. राज्यातील सिंचनक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असून आजही कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर आहे.
खतांच्या वाढलेल्या किंमती, शेतकर्यांवरील कर्ज, यामुळे शेतकरीआत्महत्या करतो,तरीही त्याच्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन हजारो कोटींचे रस्त्यांचे प्रकल्प हाती घेतले गेले. समृध्दी महामार्ग, शक्तीपिठमार्ग असे गरज नसलेल्या या प्रकल्पात टाकून मात्र शेतकर्यांच्या जमीनी कवडीमोल भावाने व बळजबरीने संपादन केल्या जात आहेत. जालना ते नांदेडसमृध्दी महामार्गात जाणारी कोट्यावधी रुपये एकर किंमत असलेली जमीन शासन केवळ २० ते २५ लाख रुपये एकर प्रमाणे दादागिरी करुन संपादन करण्याचाप्रयत्न करत आहे. जालना -नांदेड समृध्दी मार्ग व शक्तीपिठ मार्ग यांना शेतकर्यांचा व जनतेचा तीव्र विरोध आहे. शेतकर्यांना संपादीत जमीनींचामोबदला बाजारभावा प्रमाणे देण्यात यावा.यासाठी शेतकरी मागील चाळीस दिवसांपासून आंदोलन करीत आहेत त्यासही शिवसेनेचा पाठींबा असल्याचे अंबेकरयांनी सांगितले.
तर जुन्या रस्त्यांच्या सुधारणा करण्याऐवजी गुत्तेदार व उद्योगपतींच्याकल्याणासाठी हे मार्ग करण्याचा घाट घालण्यात येत आहे. १९७२ ला दुष्काळपडला व शेतकरी अडचणीत आले. तेंव्हा तत्कालीन सरकारने शेतकर्यांचेउत्पन्न वाढावे यासाठी कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून काम केले.शेतकर्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, शैक्षणिक संस्थांना परवानग्या दिल्या. मात्र आता या सर्व बाबीकडे दुर्लक्ष करुन निवडणुकीपुर्ते आश्वासने देणे व नंतर आपली भाषा सरकार बदल आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत असल्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाही सरकारला जाग न आल्यास पुढेमंत्री, मुख्यमंत्री यांच्या विरोधातही तीव्र आंदोलन करण्यात येईल.यावेळी माजी आमदार संतोष सांबरे म्हणाले की, सत्ताधारी हे केवळ स्वार्थीधोरणांकडेच लक्ष देत आहेत. त्यांना सामान्य जनता व शेतकर्यांशी काहीहीदेणे घेणे नाही. आगामी काळात अशा या लबाड लोकांना धडा शिकविण्याची वेळआल्याचे सांबरे म्हणाले. तर जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख
उपजिल्हाप्रमुखरमेश गव्हाड यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी