vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन होणार साजरा

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन होणार साजरा

रायगड-अलिबाग, ( प्रतिनिधी: शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. यानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे

हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल, नेहूली येथील प्रशस्त बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला असून, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा युवा अधिकारी कार्यालय तसेच विविध योग संस्थांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या योग दिन कार्यक्रमात जिल्हा प्रशासनांतर्गत कार्यरत सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी, विविध क्षेत्रांतील नामांकित खेळाडू, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगाभ्यासात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.

००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात २० व २१ मार्चला “ग्रंथोत्सव २०२४” होणार साजरा

शेतकऱ्यांनी विमा संरक्षित ई-पीक पाहणी करुन घ्यावी

ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलांचे अभिनंदन -उपमुख्यमंत्री अजित पवार

सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आरोग्य सेवेची पाहणी* 

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची तातडीने अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरु. 288.17 कोटींच्या श्री क्षेत्र भिमांशकर विकास आराखड्यास मान्यता

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta