vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

          सांगली, प्रतिनिधी : डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. इंटरनेट वापरताना सतर्क व जागरूक राहिल्यास इंटरनेटवरील फसवणूक आपण टाळू शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

  सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, पोलीस हवालदार किरण परदेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, इंटरनेटवरील फसवणूक टाळण्यासाठी सायबर गुन्हे आणि हॅकिंग यासारख्या धोक्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी. इंटरनेटचा जबाबदारीने वापर करावा. नवनवीन तंत्रज्ञानाचा सकारात्मक पध्दतीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी सुरक्षित इंटरनेट दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. पोलीस हवालदार किरण परदेशी यांनी इंटरनेट सुरक्षिततेबाबत माहिती दिली.00000

संबंधित पोस्ट

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी …

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्र्यांच्या हस्ते संविधान उद्देशिका कोनशिलेचे अनावरण

डोनगाव येथील नेत्र तपासणीत २६१ रूग्णांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-ब अराजपत्रित सेवा-संयुक्त परीक्षा २ फेब्रुवारी रोजी; २०६६४ उमेदवारांची बैठक व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta