vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सुरक्षित इंटरनेट वापराविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

सुरक्षित इंटरनेट वापराविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा

बुलढाणा, प्रतिनिधी: इंटरनेटच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी, विशेषतः मुले, महिला आणि तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जाणाऱ्या सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कार्यशाळा घेण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिवस पाळला जातो. यावर्षी 11 फेब्रुवारी रोजी “टूगेदर फॉर अ बेटर इंटरनेट” या संकल्पनेअंतर्गत हा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड, उपजिल्हाधिकारी अजिंक्य गोडगे, अजित जंगम, जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील खुले यांचे सह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय 11 फेब्रुवारीपासून, एक देशव्यापी जागरूकता मोहीम सुरु करत आहे. केंद्र सरकारच्या माहिती सुरक्षा आणि शिक्षण जागरुकता प्रकल्पांतर्गत आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इंटरनेट वापरकर्त्यां अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षित ऑनलाइन पद्धती, सायबर स्वच्छता, प्रमुख सायबर धोके, आणि इंटरनेट स्ट्रॅटेजीज याबाबत माहिती देण्यात आली. यासह इंटरनेटचे फायदे व तोटे, सायबर फ्रॅाड, फिशिंग, स्मिशिंग, डिजिटल अरेस्ट, ॲानलाईन फसवणुकीपासून बचाव आदी महत्त्वपूर्ण माहिती सुनील खुले यांनी या कार्यशाळेत दिली.जिल्हा माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील खुले यांनी यावेळी सादरीकरण करुन सुरक्षित इंटरनेट वापराबाबत माहिती दिली.

 

00000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यातील ‘नीट’ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

गोव्यात दुर्दैवी घटना- शिरगाव मंदिराच्या जत्रेत चेंगराचेंगरी, सहा जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जखमी झाल्याची बातमी

भारतीय रेल्वेने प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार..

ॲसिड हल्लाग्रस्त विद्यार्थिनीची पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याकडून विचारपूस

जिल्ह्यास अतिवृष्टीचा येलो अलर्ट नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta