vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर जिल्ह्यातील ‘नीट’ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर जिल्ह्यातील ‘नीट’ परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर, प्रतिनिधी: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत आयोजित ‘नीट युजी’ परीक्षा येत्या ३ मे, २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत लातूर जिल्ह्यातील लातूर आणि निलंगा तालुक्यातील एकूण ३४ उपकेंद्रांवर पार पडणार असून, या परीक्षा कालावधीत केंद्रांच्या परिसरात होणारी संभाव्य गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेवून जिल्हादंडाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये सर्व परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थींशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित जमण्यास, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यास किंवा शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली असून, परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर्स, पानटपऱ्या, टायपिंग सेंटर्स, एसटीडी बूथ आणि ध्वनिक्षेपक ही माध्यमे ३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल किंवा इतर कोणत्याही प्रसार माध्यमांसह प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून, कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीला किंवा वाहनाला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, जेणेकरून परीक्षा अत्यंत शांततेत आणि सुरळीत वातावरणात पार पडेल. हा आदेश परीक्षा केंद्रावर कर्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी, निगराणी करणारे पथक आणि पोलीस अधिकारी यांना त्यांच्या कार्यालयीन कर्तव्ये पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाही, मात्र इतर सर्व नागरिकांनी या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

****

संबंधित पोस्ट

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी”बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” तत्त्वावर

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चे उद्घाटन जलव्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

अमृत’ संस्थेची प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजना; जिल्ह्यातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा– विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन, स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य..

कृष‍ि विभागाची धडक कारवाई व‍िनापरवाना बीटी कापुस ब‍ियाणे व‍िक्री प्रकरणी गुन्हा दाखल 

vishwatmaklokswamivarta