vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत निवडणूक : मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

 

सांगली, प्रतिनिधी : राज्यातील माहे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या सुमारे 1 हजार 673 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. यासाठी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 साठी वापरलेली विधानसभेची मतदार यादी वापरण्यात येणार आहे.

या निवडणुकांकरिता पारंपरिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, 19 मार्च 2025. हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी बुधवार, 19 मार्च 2025 ते सोमवार, 24 मार्च 2025 पर्यंत आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक बुधवार, 26 मार्च 2025 असा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा ‘विभागीय आयुक्ता’कडून आढावा…

vishwatmaklokswamivarta

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी व युवकांसाठी नव्या योजना मंजूर

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता

महाराष्ट्रात ‘हलाल प्रमाणपत्रां’वर बंदीची मागणी-उपमुख्यमंत्र्यांकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध