vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

गेट वे ऑफ इंडिया येथे ‘जागर संविधानाचा’ भव्य कार्यक्रम-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार…

 

राज्य प्रतिनिधी-मुंबई: संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा हा सांगीतिक कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा हा सोहळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेली मूल्ये, तत्वे आणि त्यांचे विचार जगाला मार्गदर्शक असून त्यांची ही मूल्ये व विचार जगाच्या व्यासपीठावर नेण्यात येणार असून अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात सुध्दा चर्चासत्र, शोधनिबंध सादर करण्यात येतील, असा संस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये आमदार संजय उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, राज पुरोहित, मुख्यमंत्री कार्यालयाचे व संस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह सिने, नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

मंत्री श्री. शेलार म्हणाले, संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करून संविधानाचा जागर करण्यात येत आहे. राज्यात या निमित्ताने चर्चासत्रे, उद्देशिकेचे वाचन, घरोघरी संविधान यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधान जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी मांडण्याचा सांस्कृतिक विभागाचा संकल्प आहे.अरबी सागराच्या साक्षीने आणि गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी हजारोंच्या उपस्थितीत ‘जागर संविधानाचा’ हा कार्यक्रम होत आहे. नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे मंत्री श्री. शेलार म्हणाले.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.

संबंधित पोस्ट

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर वार्षिक१२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार…

लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटीबद्ध

vishwatmaklokswamivarta

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान..

सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना; सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नांदेड क्षेत्रीय प्रचार समितीकडून व्यापक जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta

कोयनानगर एमटीडीसी रिसॉर्टचा होणार कायापालटकोयना परिसर पर्यटनाचे हब होणार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई..