vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोमवारी घेणार शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील अनुपालनाचा आढावा

सांगली, प्रतिनिधी शासकीय जनसंवाद कार्यक्रमातील नागरिकांच्या अर्जांसंबंधी शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या अनुपालनाचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दि. 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता घेणार आहेत. या अनुपालन सभेत दि. 30 जुलै रोजीच्या शासकीय जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी दिलेल्या अर्जावरील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून, असे अर्ज दिलेल्या नागरिकांनी या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मा. पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही अनुपालन सभा होणार आहे. नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी सोडवल्या जाव्यात, या उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. ३० जुलै रोजी शासकीय जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. नागरिकांच्या प्राप्त अर्जावर केलेल्या अहवालासह विभागप्रमुखांनी या सभेस उपस्थित राहण्यास सूचना देण्यात आल्या असून, संबंधित नागरिकांनीही या सभेस उपस्थित राहून आपल्या अर्जावर करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे आवाहन मा. पालकमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे

दुसरा शासकीय जनसंवाद कार्यक्रम आगामी कालावधीत आयोजित करण्यात येणार असून, त्याची तारीख स्वतंत्ररीत्या कळवण्यात येईल. शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या समस्या यांना या शासकीय जनसंवाद कार्यक्रमातून व्यासपीठ उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

अद्यापही ऊसदर जाहीर न केलेल्या कारखान्यांनी त्वरित दर जाहीर करावा**- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश • जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त • महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक २६ एप्रिल रोजी; पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा..

अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा कराअन्यथा रास्ता रोको आंदोलन; नागरिकांचा ईशारा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले