vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

अमृत संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय रायगड-अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत लवकरच सुरू होणार..

रायगड प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन अंगीकृत ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रबोधिनी अर्थात, ‘अमृत’ ही खुल्या प्रवर्गातील समाजघटकांच्या सर्वांगीण उत्कर्षांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेचे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयीन इमारतीत लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ‘अमृत’चे रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी नुकतीच दिली आहे.

या विषयी ते म्हणाले, अमृत संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) श्रीराम बेंडे साहेब रायगड जिल्ह्याच्या दौऱ्या दरम्यान अलिबागला आले असता त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. तसेच निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के आणि तहसिलदार महसूल (चिटणीस) चंद्रसेन पवार यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीमधे त्यांनी “अमृत- चे रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालय अलिबागमधे सुरु करण्याच्या व “अमृत च्या कार्यासंदर्भात विस्तृत चर्चा केली.

तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांचीही भेट घेऊन “अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या संदर्भात विस्तृत चर्चा केली. त्याचबरोबर माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनाही भेटून “अमृत संस्थेच्या वेळोवेळी सुरु होणाऱ्या योजनांचा प्रचार-प्रसार-प्रसिद्धी या विषयी सहकार्य देण्या संदर्भात विनंती केली.

“अमृत- संस्थेच्या योजनेत, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना विविध प्रकारची मदत दिली जाते. त्याचप्रमाणे विविध व्यवसायांचं शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन दिले जाते. विविध शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ मिळवण्यासाठीची आवश्यक ती मदत केली जाते. या वर्गातील होतकरू व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रशिक्षण तसंच आर्थिक साहाय्य आणि कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जातं. पात्र उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठीही कार्यक्रम राबवले जातात. या विविध योजनांमुळे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मोलाची मदत होणार असून, दुर्लक्षित घटकातील लोकांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये मदत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेत, लाभार्थ्यांना त्यांच्या गरजांनुसार मदत दिली जाते.

अमृत संस्थेच्या योजनेच्या अंतर्गत संगणक, टंकलेखन आणि लघुलेखन प्रशिक्षण योजना, विविध स्पर्धा परीक्षांसाठी पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रम, उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण (C-DAC), स्वयं शिक्षण प्रोत्साहन योजना राबवण्यात येतातच. शिवाय एम्.सी.ई.डी. यांच्या बरोबर केलेल्या कराराप्रमाणे सोलर पॅनल देखभाल दुरुस्ती, अमृत बेकरी, आयात निर्यात प्रशिक्षण, तसेच MCED संलग्नित स्वयं-रोजगार प्रशिक्षण व PMEGP/CMEGP PROJECT मार्गदर्शन असे अनेकविध उपक्रम राबविण्यात येतात.

अमृतमधील विविध उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी खुल्या प्रवर्गातील समाजघटकांनी अलिबाग येथील मध्यवर्ती कार्यालय अथवा शैलेश मराठे यांच्याशी 9112228759 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा अथवा अधिक माहितीसाठी या वेबसाइटला (www.mahaamrut.org.in) भेट द्यावी.”

000000

संबंधित पोस्ट

भगवान महावीर 2550 व्या निर्वाण कल्याणक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आपत्ती नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित- आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्ती कक्ष व हेल्पलाइन कार्यान्वित शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा..

स्वातंत्र्याचा ७५ वा अमृतमहोत्सव व ८० वा ऑगस्ट क्रांती दिन ऑगस्ट क्रांती दिन निमित्ते मालाड मध्ये जनजागृती 🇮🇳🇮🇳प्रभात फेरीचे आयाेजन

श्रावण सोमवार तसेच गणेश उत्सव व सणासुदीच्या दिवसांची सुरुवात होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न नमुने तपासणी मोहीम…

निवडणूक कर्तव्यावर मतदान पथके रवाना

शासनाच्या सहभागाने सातारा येथे शाही दसऱ्याचे आयोजन**- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta