vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू..

अनुसूचित जाती व नवबौध्द मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू..

        सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांमार्फत सांगली जिल्ह्यामध्ये अनुसूचित व नवबौद्ध मुलां-मुलींच्या 200 क्षमता असणाऱ्‍या 06 शासकीय निवासी शाळा शासकीय इमारतीमध्ये कार्यरत असून इयत्ता 6 वी ते 10 वी सेमी इंग्रजी माध्यम या वर्गासाठी खालील निवासी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती समाज कल्याण सांगलीचे सहाय्यक आयुक्त मेघराज भाते यांनी केले आहे.

     सांगली जिल्ह्यातील मुलां-मुलींच्या शासकीय निवासी शाळांमध्ये विद्यार्थी/विद्यार्थिनींना कोणतीही फी न घेता मोफत प्रवेश दिला जातो. निवासी शाळेत मुलां/मुलींना सुसज्ज शासकीय इमारतीत निवास, निवास साहित्य, भोजन, दैनंदिन वापराचे साहित्य, पाठ्यपुस्तके, वह्या, इतर शैक्षणिक साहित्य व गणवेश अशा प्रकारच्या सुविधा मोफत दिल्या जातात. विद्यार्थी/विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाकरिता सुसज्ज अद्यावत वर्ग खोल्या, ग्रंथालय, व्यायामशाळा, ई-लर्निंग, मनोरंजन कक्ष, ई-लायब्ररी इत्यादी सोयीसुविधेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

  प्रवेशासाठी प्रवर्गनिहाय जागा आरक्षित व मर्यादित असून अनु.जाती व नवबौद्ध 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, विजाभज 5 टक्के, दिव्यांग 3 टक्के, एस.बी.सी. 2 टक्के याप्रमाणे शासकीय निवासी शाळेत प्रवेश निश्चित केला जातो. प्रवेशासाठी शाळांचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा.

    निवासी शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव व त्यांचा संपर्क क्रमांक अनुक्रमे पुढीलप्रमाणे. मुलांची शासकीय निवासी, कवठेएकंद ता. तासगांव – पी. सी. भातलंवडे, 9284801040. मुलांची शासकीय निवासी, विटा ता. खानापूर – श्रीमती प्रितम भोसले, 7028010118. मुलांची शासकीय निवासी, कवठेमहांकाळ ता. कवठेमहांकाळ – धनाजी सरगर, 9325385571. मुलांची शासकीय निवासी, वांगी ता. कडेगांव – एस. एच. भेासले, 8698029878. मुलींची शासकीय निवासी, बांबवडे ता. पलूस – तानाजी करचे, 9766040998. मुलींची शासकीय निवासी, जत ता. जत – डी. डी. जाधव, 8275207276.

 सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश अर्ज शासकीय निवासी शाळा व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सांगली येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहेत. इयत्ता 6 वी ते इ. 10 वी मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर फर्स्ट’ मधून कोल्हापूरच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी विचारमंथन विकासासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, उद्योजक, संघटना, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्याचा निर्धार

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाने राज्यस्तरावर नावलौकिक मिळवावा – पालकमंत्री संजय राठोड पालकमंत्र्याच्या हस्ते विभागीय महसूल महोत्सवाचे उद्घाटन

बिहार मध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो महाबोधी महाविहार प्रश्नी बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*बौद्ध आंबेडकरी जनतेचे आझाद मैदानात रखरखत्या उन्हात विराट शक्तिप्रदर्शन*

vishwatmaklokswamivarta