vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन…

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारतामधील सातत्यपूर्ण इतिहासात एकशे बहात्तर वर्षांनी मिझोराम राज्याला पहिला रेल्वे मार्ग लाभला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे मार्गाचं उद्घाटन केलं असून, या कामामुळे भारतीय रेल्वेच्या जाळ्यात आणखी विस्तार झाला आहे. मिझोराममध्ये पूर्वी रेल्वे नसल्याने हा एक ऐतिहासिक क्षण समजला जात आहे.

हा प्रकल्प सुमारे आठ हजार सत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या मार्गात खोल दऱ्यांचा आणि अवघड भौगोलिक परिस्थितींचा समावेश असून कामाच्या दरम्यान पंचेचाळीस मोठे बोगदे, पंचावन्न मोठे पूल आणि अठ्ठ्याएंशी लहान पूल तयार करण्यात आले आहेत. एका पूलची उंची दिल्लीतील कुतुब मीनारपेक्षाही जास्त आहे, असे सांगितले गेले आहे.

नव्या मार्गानुसार राजधानी एक्स्प्रेस ही ट्रेन रोज आयजोल येथून सुटणार असून, अंनंद विहार दिल्ली स्थानकावर पोहोचायला त्रेचाळीस तास पंचवीस मिनिटे लागणार आहेत. ही ट्रेन काही विशिष्ट थांबे घेऊन जाईल. त्याचप्रमाणे मिझोराम एक्स्प्रेस, गुवाहाटी एक्स्प्रेस, तसेच इतर मालवाहू सेवा लवकरच सुरू होणार आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भविष्यात या रेल्वे मार्गाचा विस्तार करण्याचेही नियोजन आहे.

संबंधित पोस्ट

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

अवयवदानाचा सांगली पॅटर्न तयार करावा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ची भावना नागरिकांत रूजविण्याचे आवाहन- अवयवदानासाठी क्यू आर कोड सुविधेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनावरण…

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस…

दोन महिला चालवतात फरलव्ह पेट रिसॉर्ट व डॉग ट्रेनिंग सेंटर

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य पदाचे अंतिम आरक्षण जाहीर*

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे