vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

यूपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत

यूपीआय व्यवहारांची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली

राज्य प्रतिनिधी-युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस ही देशातील सर्वाधिक वापरली जाणारी डिजिटल पेमेंट प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे होणाऱ्या व्यवहारांच्या मर्यादेत मोठा बदल करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अर्थात एनपीसीआयने यूपीआय व्यवहारांची कमाल मर्यादा आता दहा लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल येत्या दिनांक पंधरा तारखेपासून लागू होणार आहे.

तथापि, व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच एका दिवसाला एक लाख रुपये इतकीच राहणार आहे. इतर क्षेत्रांमध्ये मात्र मर्यादा वाढवण्यात आली आहे. भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठीची मर्यादा प्रति व्यवहार दोन लाखांवरून वाढवून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच ई-मार्केटप्लेसवरील शासकीय व्यवहारांची मर्यादा देखील एक लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे.

याशिवाय, यूपीआयच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बिलांचा भरणा प्रति दिवस पाच लाख रुपयांपर्यंत करता येणार आहे. तर सोने-चांदी व दागिने खरेदीसाठी यापूर्वी एक लाख रुपयांची असलेली मर्यादा आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उच्च मूल्याच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळणार असून, नागरिकांना आणि व्यवसायिकांना आर्थिक व्यवहारात सुलभ करता येणार आहे

संबंधित पोस्ट

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुनअहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे..

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अन्नधान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी (शिधापत्रिकाधारक) ई-केवायसी प्राथम्याने पूर्ण करावी

फलटण शहरातील मलटण परिसराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे वाहून गेली होती परंतु फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचारी यांनी शर्तीने 24 तासांमध्ये सदरची पाईपलाईन दुरुस्त करून सर्व शहराचा पाणीपुरवठा चालू केला

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यकØ राज्य निवडणूक आयोगाचे आदेश जारीØ जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समिती गठीत…

vishwatmaklokswamivarta