vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

नाशिक, प्रतिनिधी): नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित नाशिक विभागाच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (नाशिक ग्रामीण), पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (नाशिक शहर), नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते, तर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), महेश्वर रेड्डी (जळगाव), श्रवण दत्त (नंदुरबार), अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे (अहिल्यानगर) हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृहांची सुविधा असावी. तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती- पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे.

रेल्वे प्रवासात महिलांशी निगडित काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलिस दलाने नियमितपणे संवाद साधावा. दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्य बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांनी सांगितले की, विभागातील पाचही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी कारवाई करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येत आहेत.

०००

संबंधित पोस्ट

मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार पाणी जपून वापरण्याची आवाहन मुंबई महानगरपालिका .पाइपलाइनच्या कामासाठी 5-6 फेब्रुवारी रोजी मुंबईतील अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही

vishwatmaklokswamivarta

भारतीय नेमबाज अनिश भानवळा यांनी काहिरो, इजिप्त येथे झालेल्या ISSF वर्ल्ड शुटिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले आहे. 🇮🇳🏆

vishwatmaklokswamivarta

आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

शेतकऱ्यांसाठी भारतीय कपास महामंडळानेकापूस किसान मोबाईल अँप केले विकसीत

vishwatmaklokswamivarta

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर उपक्रमातून सायन रुग्णालयाला अत्याधुनिक बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णसेवा अधिक गतिमान होणार