vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*आंबेडकरी चळवळीचे लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

मुंबई प्रतिनिधी ~ आंबेडकरी चळवळीला आपले जीवन समर्पित केलेले लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी कवी गीतकार संगीतकार म्हणून दिलेले योगदान प्रेरणदायी आहे.त्यांनी आपल्या गीतातून समाजप्रबोधन केले.अंधश्रद्धेवर प्रहार केला.आंबेडकरी चळवळीतील त्यांचे योगदान अजरामर आहे. दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या स्मृती जोपासण्यासाठी मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारले पाहिजे. समाजाच्या हिता साठी रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही त्यांची इच्छा होती.समाजाचे ऐक्य होणे हीच खरी लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर पूर्व येथे दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेत ना. रामदास आठवले बोलत होते.रिपब्लिकन पक्षाच्या वतीने दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांच्या जाहीर श्रद्धांजली सभेचे आयोजन माता रमाबाई अंबेडकर नगर येथे करण्यात आले होते.यावेळी आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते समाज सेवक आणि सर्व गायक गीतकार कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.लोकशाहीर दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांना श्रद्धांजली वाहण्यास सर्व आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने एकत्र आला असल्यामुळे एक आंबेडकरी चळवळीचे वातावरण यावेळी अनुभवायास मिळाले.यावेळी बुद्धगया येथील महाविद्याहाविहार मुक्ती साठी आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा कृतिशील पाठिंबा असल्याचे ना.रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.यावेळी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी दिवंगत प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या प्रल्हाद शिंदे नंतर वडील म्हणून प्रेम दिले.बालपणापासून आम्हाला प्रभाकर पोखरीकर यांनी आम्हाला पित्याची माया दिले.त्यांच्या निधनाने आज मी पोरका झालो असल्याची शोकभावना गायक आनंद शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी राज्यभरातून आलेल्या गायकांनी दिवंगत लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांना गायनातून श्रद्धांजली वाहिली.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि परिवर्तन कलाहासंघाचे सर्व प्रमुख गायक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

हेमंत रणपिसे ,प्रसिद्धी प्रमुख

संबंधित पोस्ट

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यातील 42 कामांना प्रशासकीय मान्यता;9 बांधकामे पूर्ण

vishwatmaklokswamivarta

आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षा’च्या माध्यमातून लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप.

लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे समाजसेवक मुसा खान व मुन्नाभाई यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन 

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार: ‘भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करा’– आमदार टी. राजा सिंह यांचे प्रतिपादन१६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत अकोल्याचे ‘एकवीरा मैदान’ चैतन्यमय;संतांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा..

vishwatmaklokswamivarta

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta