vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जूनलाआवेदनपत्र भरण्याची मुदत 16 एप्रिलपर्यंत…

सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता (MAHATET)- २०२६ परीक्षेचे रविवार, दि. 21 जून 2026 रोजी आयोजन केले आहे. या परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दि. 27 मार्च 2026 पासून सुरु असून दि. 16 एप्रिल 2026 पर्यंत परीक्षार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आवेदनपत्र भरता येतील. संबंधित परीक्षार्थ्यांनी याची काळजीपूर्वक नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) व इ. ६ वी ते इ. ८ वी (पेपर २) साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. सर्व संबंधित परीक्षार्थ्यांनी या संकेतस्थळास नियमित भेट द्यावी.

ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी दि. 27 मार्च 2026 ते दि. 16 एप्रिल 2026, प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दि. 9 ते 21 जून 2026, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर I दिनांक व वेळ – रविवार दि. 21 जून 2026, वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर II दिनांक व वेळ – रविवार दि. 21 जून 2026, वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 पर्यंत.

काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्यावत माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केली जाईल याची परीक्षायऱ्यांनी नोंद घ्यावी, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी**वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ?* – हिंदु जनजागृती समिती

राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

नांदेड विमानतळ विकासासाठी प्रस्ताव तात्काळ सादर करा- पालकमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी कार्यालयात विमानतळ विकास कामांबाबत आढावा…

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबरला भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुल्यप्रस्तावाधारित व्याघ्र संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश· कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी· राज्यात कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर करण्याबाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta