मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार
सांगली, प्रतिनिधी: मिशन लक्ष्यवेध योजनेतून सांगली जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रतिभा विकास केंद्र यामार्फत रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग अशा एकूण 5 क्रीडा प्रकारामधून प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. निवड चाचणी करीता सांगली जिल्ह्यातील रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग या खेळाच्या खेळाडूंनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज dsosport_sangli@rediffmail.com या ई-मेल आयडीवर किंवा प्रत्यक्षात दि. 9 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली येथे सादर करावे. जिल्हास्तर निवड चाचणी करीता सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी केले आहे.कीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत मिशन लक्ष्यवेध योजना कार्यन्वित करण्यात येत आहे. मिशन लक्ष्यवेध योजना या माध्यमातून ऑलिम्पिकस्तरावर खेळल्या जाणाऱ्या 12 खेळ प्रकारामध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे महाराष्ट्र शासनाचा मानस आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यातील खेळ व खेळाडू, कीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभूत सुविधा, क्रीडा स्पर्धेचे आयोजन, क्रीडा वैद्यकशास्त्र, खेळाडूंना प्रोत्साहन व पुरस्कार, खेळाडूंना करिअर मार्गदर्शन, खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी देशी विदेशी संस्थांचा सहयोग हे सर्व घटक विकसीत करणे आहे. ही योजना हि त्रिस्तरीय असून राज्यस्तरावर हाय परफॉमन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर व जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिमा विकास केंद्र राबविण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र या माध्यमातुन रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बैडमिंटन, वेटलिफ्टिंग या खेळाकरीता निवड चाचणीचे आयोजन करणे प्रस्तावित आहे. राज्यातील पात्र व गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना संबंधीत खेळामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहेत,
खेळाडू पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे – खेळाडूचे वय त्या वर्षाच्या ३१ डिसेंबर रोजी २१ वर्षाआतील असावे. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे – जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वैद्यकीय तपासणी (शासन मान्यताप्राप्त डॉक्टराकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र), अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, गत 02 वर्षातील क्रीडा विषयक कामगिरीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज 03 फोटो. शाळा महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र. पालकांचे संमतीपत्र, इ. लावणे आवश्यक आहे.
खेळाडू हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असला पाहिजे, क्रीडा स्पर्धेतील किमान कामगिरी राज्यस्तरावरील सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू, (शालेय / संघटना अधिकृत स्पर्धा) गत २ वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक राहील.
निकष पूर्ण करणाऱ्या खेळाडूंची निवड तज्ज्ञ समितीव्दारे करण्यात येणार असुन ही प्रक्रीया अनिवासी राहील. खेळाडूंना आवश्यक पुरक आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, राष्ट्रीय व विदेशी स्पर्धा प्रवास खर्च, प्रशिक्षक / मार्गदर्शक, वैद्यकीय उपचार, विमा आणि प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च या योजनेंतर्गत केला जाणार आहे. निवड चाचणी आयोजन समिती प्रमुख क्रीडा कार्यकारी अधिकारी नरेश सावंत मो. ९६०४८१३८८१ हे राहतील.