vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत नोंदणी; शाळांनी सहभागाचे आवाहन

जिल्हास्तरीय सुब्रतो कप फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत नोंदणी; शाळांनी सहभागाचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सुब्रतो मुखर्जी स्पोर्ट्स एज्युकेशन सोसायटी, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने सन २०२६-२७ या वर्षातील जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धा १७ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक शाळा व संघांनी १० जुलै २०२६ पर्यंत ऑफलाइन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांनी केले आहे.

स्पर्धेचे आयोजन सहकार विद्या मंदिर, चिखली रोड, बुलढाणा येथे सकाळी ९ वाजल्यापासून होणार आहे. १७ जुलै रोजी १५ वर्षांखालील (सबज्युनिअर) मुलांची, १८ जुलै रोजी १७ वर्षांखालील (ज्युनिअर) मुलांची आणि १९ जुलै रोजी १७ वर्षांखालील (ज्युनिअर) मुलींची स्पर्धा होईल. स्पर्धेसाठी १५ वर्षांखालील गटातील खेळाडूंचा जन्म १ जानेवारी २०१२ किंवा त्यानंतरचा, तर १७ वर्षांखालील मुलगे व मुलींचा जन्म १ जानेवारी २०१० किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शालेय संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेपूर्वी https://www.subrotocup.in/register या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य असून, त्याची प्रत ऑफलाइन अर्जासोबत जोडावी. ऑफलाइन नोंदणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरून रोड, बुलढाणा येथे १० जुलै २०२६ पर्यंत स्वीकारली जाणार आहे. मुदतीनंतर कोणत्याही संघाचा प्रवेश स्वीकारला जाणार नाही.

प्रवेश अर्जासोबत खेळाडूंचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, वर्ग, आधार क्रमांक, शाळेचे नाव व पत्ता, यू-डायस क्रमांक, खेळाडूची स्वाक्षरी, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक तसेच मुख्याध्यापक किंवा संस्था प्रमुख यांची स्वाक्षरी व शिक्का असणे आवश्यक आहे. स्पर्धेदरम्यान पात्रता फॉर्म, जन्मदाखला, आधारकार्ड, दाखल-खारिज प्रत व पासपोर्ट (सर्व मूळ प्रती) सादर करणे बंधनकारक राहील

१५ वर्षांखालील खेळाडूंसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असून, AIFF मान्यताप्राप्त Skeleton Maturity Age Determination Test करून घेणेही बंधनकारक राहणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, एखादा खेळाडू वयोमर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळल्यास संबंधित संपूर्ण संघ अपात्र ठरेल, असा इशाराही देण्यात आला आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जिवन मोहोड (मो. ९४०५७३४४०३) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी..

बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता**ग्रीन मॅरेथॉनव्दारे नेरूळ विभागात पर्यावरण संवर्धन संदेशाचे प्रसारण

खेळाडूंना घरबसल्या ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ सुविधा!

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्याफुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

नवे सचिव माजी क्रिकेटपटू देवजीत सैकिया  यांनी जय शाह यांच्या जागी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BBCI) सचिवपदाची सूत्रे स्वीकारली..

vishwatmaklokswamivarta