vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

न्यू पनवेलमध्ये “मिशन लक्ष्यवेध” टेबल टेनिस, मुंबई विभागीय निवड चाचणीचा बिगुल ३४ अव्वल खेळाडूंमध्ये चुरस

न्यू पनवेलमध्ये “मिशन लक्ष्यवेध” टेबल टेनिस, मुंबई विभागीय निवड चाचणीचा बिगुल ३४ अव्वल खेळाडूंमध्ये चुरस

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रातील भावी जागतिक विजेते घडवण्याच्या उद्देशाने शासनाच्या “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई विभागीय टेबल टेनिस निवड चाचणीला न्यू पनवेल येथे (दि.९ एप्रिल रोजी) दिमाखात सुरुवात झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या यजमानपदाखाली ही चाचणी पार पडत आहे.

विभागीय उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या मार्गदर्शनाखाली या चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी क्रीडा प्रशासनातील समन्वयक जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर सुहास व्हनमाने, आयोजक जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड श्री. प्रकाश वाघ, निवड समिती व मार्गदर्शक श्रीमती श्रेया बोर्डवेकर तसेच श्रीमती सुचिता ढमाले, निळकंठ आखाडे (राज्य क्रीडा मार्गदशक) श्री. संजय कडू (सचिव, टेबल टेनिस संघटना), तसेच निवड समिती सदस्य अनिल बंदेल (राज्य क्रीडा मार्गदर्शक) व श्री. असद सय्यद (राज्य क्रीडा मार्गदर्शक) अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

या निवड चाचणीसाठी संपूर्ण विभागातून ८३ खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र, मिशन लक्ष्यवेधच्या कडक निकषांनुसार छाननी केल्यानंतर केवळ ३४ खेळाडू या चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. सहभागी खेळाडूंमध्ये २ आंतरराष्ट्रीय, १५ राष्ट्रीय आणि १८ राज्यस्तरीय पदक विजेत्यांचा समावेश असल्याने स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च दर्जाची आहे.

केवळ सामन्यांतील विजय-पराजय न पाहता, खेळाडूच्या सर्वांगीण क्षमतेवर भर देण्यात येत आहे. यासाठी प्रामुख्याने तीन स्तरांवर मूल्यांकन केले जात आहे: फिटनेस टेस्ट: खेळाडूंची शारीरिक सुदृढता आणि चपळता. स्किल टेस्ट: तांत्रिक कौशल्य आणि खेळातील बारकावे. थेट स्पर्धा: प्रत्यक्ष सामन्यातील कामगिरी आणि मानसिक सक्षमता.

“मिशन लक्ष्यवेध” च्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या या खेळाडूंना पुढील टप्प्यावर विशेष प्रशिक्षण आणि सुविधा पुरवल्या जाणार आहेत, जेणेकरून ते ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील.

000000

संबंधित पोस्ट

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या चुरशीच्या लढती

vishwatmaklokswamivarta

मौलाना अबुल कलाम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडल्या ॲथलेटिक्स स्पर्धा

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन   

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धेसह विविध कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर- रोइंग, लॉन टेनिस, मैदानी, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील प्रत्येकी 20 खेळाडूंची निवड होणार

vishwatmaklokswamivarta