vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत लातूरला निवासी क्रीडा निपुणता केंद्र;ॲथलेटिक्स व कुस्ती खेळाडूंची ७ व ८ एप्रिल रोजी नैपुण्य चाचणी

‘मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत लातूरला निवासी क्रीडा निपुणता केंद्र;ॲथलेटिक्स व कुस्ती खेळाडूंची ७ व ८ एप्रिल रोजी नैपुण्य चाचणी

लातूर, प्रतिनिधी राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी राज्य शासनाने ‘मिशन लक्ष्यवेध’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत लातूर विभागामध्ये ॲथलेटिक्स व कुस्ती या दोन क्रीडा प्रकारांचे ‘निवासी विभागीय क्रीडा निपुणता केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी अर्ज केलेल्या आणि छाननी अंती पात्र ठरलेल्या खेळाडूंची क्रीडा नैपुण्य चाचणी ७ व ८ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, आधुनिक पायाभूत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र आणि खेळाडूंना करिअर मार्गदर्शन अशा विविध घटकांच्या विकासासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. याअंतर्गत लातूर येथे होणाऱ्या चाचणीसाठी ॲथलेटिक्स प्रकारातील पात्र खेळाडूंनी ७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता पोलीस मुख्यालय मैदान, बाभळगाव येथे उपस्थित राहायचे आहे. तसेच कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी पात्र खेळाडूंची चाचणी जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथील कुस्ती हॉलमध्ये ७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू होईल. ही चाचणी प्रक्रिया ७ व ८ एप्रिल असे दोन दिवस चालणार आहे.

सर्व पात्र खेळाडूंना यापूर्वीच सूचनापत्रे पाठविण्यात आली आहेत. तरी ॲथलेटिक्स आणि कुस्ती या दोन्ही प्रकारातील पात्र खेळाडूंनी निश्चित केलेल्या वेळेत आणि स्थळी आपल्या क्रीडा साहित्यासह नैपुण्य चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन लातूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक महादेव कसगावडे यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

नमुंमपा चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेच्या पुरुष गटात नागपूर तसेच महिला गटात पुणे विजयी*