vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्ह्यातील खेळाडू घडावेत, त्यांच्या कौशल्यांना वाव मिळावा आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबीर दि. १ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार असून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० या दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. जिल्हा क्रीडा संकुल, जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, तालुका क्रीडा संकुल (धाड नाका शेरीवेल) तसेच एडेड हायस्कूलचे मैदान या ठिकाणी शिबीर होणार आहे. शिबीराचा शुभारंभ दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल, बुलडाणा येथे होणार आहे.

या शिबिरात मैदानी खेळांसह आर्चरी, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आदी विविध खेळांचे आधुनिक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य क्रीडा मार्गदर्शक, तसेच जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

८ ते १७ वयोगटातील विद्यार्थी (मुले व मुली) या शिबिरात सहभागी होऊ शकतात. मात्र ८ ते १४ वयोगटाला प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेत वाढ होऊन त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल. यासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी चित्रकला, योगा, एरोबिक्स, लाठी-काठी, क्रीडा दुखापत व प्रथमोपचार, तसेच आहार विषयक मार्गदर्शन तज्ञांकडून दिले जाणार आहे.

हे शिबीर पूर्णपणे विनामूल्य असून नियमित उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करावी तसेच अधिक माहितीसाठी उज्वला लांडगे (मो. ९७६४७३२७६८) व जीवन मोहड (मो. ९४०५७३४४०३) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

खेळाडूंसाठी १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्याफुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न

vishwatmaklokswamivarta

CISCE रिजनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत विहार शाळेचा झेंडा* 14 वर्षाखालील मुलींची संपूर्ण टीम नॅशनलसाठी सिलेक्ट..

vishwatmaklokswamivarta

एनसीसी संचालनालय, महाराष्ट्रने शनिवार वाडा येथून पुणे-दिल्ली सायकल मोहीम ‘शौर्य के कदम, क्रांती की ओर’ ला हिरवा झेंडा दाखवून केले रवाना

vishwatmaklokswamivarta

संकल्प ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध स्पर्धेला गोरेगाव येथे दमदार सुरुवात

vishwatmaklokswamivarta

कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात.

vishwatmaklokswamivarta