vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बुलढाणा प्रतिनिधी : शिवछत्रपती क्रीडापीठ अंतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनींमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन खेळाडूंच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया सरळ प्रवेश व कौशल्य चाचणीच्या माध्यमातून निवासी व अनिवासी खेळाडूंकरिता राबविण्यात येणार आहे.

विभाग व राज्यस्तरीय कार्यक्रम तसेच विभागस्तरावर होणाऱ्या चाचण्यांसाठी खेळाडूंचा डेटा संकलित करण्यासाठी गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व इच्छुक खेळाडूंनी https://forms.gle/aqnpWXJKP2wsMVpdA या लिंकद्वारे नोंदणी करावी. नोंदणीची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२६ पर्यंत आहे. यानंतर नोंदणीकृत खेळाडूंची यादी खेळ व चाचणीनिहाय संबंधित विभागीय उपसंचालकांकडे पाठविण्यात येईल.

जे खेळाडू गुगल लिंकवर नोंदणी करणार नाहीत, त्यांच्या नावांची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी संबंधित विभागीय उपसंचालकांना त्वरित कळवावी. तसेच, चाचणीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या खेळाडूंनाही चाचणीची संधी देण्यात येणार आहे.

नोंदणीकृत सर्व खेळाडूंना चाचणीचे ठिकाण व दिनांक विभागीय उपसंचालकांकडून कळविण्यात येईल. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना ही माहिती पोहोचवावी. क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी चाचण्या प्रथम विभागस्तरावर व त्यानंतर राज्यस्तरावर आयोजित करण्यात येतील. 0000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2025-26 ( 14 वर्षे मुले व मुली ..

vishwatmaklokswamivarta

लातूर विभागात मिशन लक्ष्यवेध अंतर्गत ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र सुरू होणार; खेळाडूंनी २० मार्चपर्यंत अर्ज सादर करावेत

देशभरातील २० एनसीसी महिला कॅडेट्सनी ३० दिवसांची ‘अपराजिता – परांग ला २०२६’ ही उंचावरील गिर्यारोहण मोहीम यशस्वीपणे पूर्ण …

vishwatmaklokswamivarta

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत आर्थिक सहाय्यासाठी खाजगी अकादमींनी 6 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावेत- जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर

vishwatmaklokswamivarta

अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते बक्षिस वितरित