मेरा युवा भारत अंतर्गत पी.एन.पी कॉलेज येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न
खेळ प्रतिनिधी-रायगड-अलिबाग, – मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने पी.एन.पी. कॉलेज वेश्वी, अलिबाग येथे (दि.21 मार्च रोजी) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धां संपन्न झाल्या.
यावेळी चित्रलेखा पाटील- कार्यवाह पी.एन.पी.एज्युकेशन सोसायटी अलिबाग, अमित पुंडे – जिल्हा युवा अधिकारी मेरा युवा भारत, तपस्वी नंदकुमार गोंधळी – राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा प्रिझम सामाजिक विकास संस्था, सुचिता साळवी – संचालिका स्पर्धा विश्व अकॅडमी, क्रीडा शिक्षक तेजस म्हात्रे, यतीराज पाटील, पंच पुरुषोत्तम पिंगळे, नंदकुमार वरसोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी उपस्थित बहुसंख्य खेळाडूंना शुभेच्छा व मार्गदर्शन करताना खेळाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिले. तसेच चित्रलेखा पाटील यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त खेळाडू पुढे यावेत याकरिता खेळाडूंना नेहमीच सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
मेरा युवा भारत अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या संघांना क्रीडा साहित्याचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे राहिला: गोळा फेक मुले- स्वराज उमेश शिंदे प्रथम क्रमांक, मीत राजन राऊत द्वितीय क्रमांक, भावेश मनोज भगत तृतीय क्रमांक. गोळा फेक मुली – कीर्ती संजय कडवे प्रथम क्रमांक, हर्षाली अभय गावंड द्वितीय क्रमांक, साक्षी शशिकांत पाटील तृतीय क्रमांक, 400 मीटर धावणे मुले – यश दत्ताराम म्हात्रे प्रथम क्रमांक, सुशांत रवींद्र मढवी द्वितीय क्रमांक, अक्षय राजा लेंडी तृतीय क्रमांक, 400 मीटर धावणे मुली – साक्षी जयेंद्र शिंदे प्रथम क्रमांक, आशिष निलेश पाटील द्वितीय क्रमांक, अक्षता महेंद्र वार्डे तृतीय क्रमांक,कबड्डी स्पर्धा मुले- विभागीय स्पोर्ट्स खारेपाट विभाग प्रथम क्रमांक, जय हनुमान मंडळ मुरुड द्वितीय क्रमांक, खो- खो स्पर्धा मुली- प्रिझम सामाजिक विकास संस्था प्रथम क्रमांक, कुलाबा क्रीडा प्रबोधनी, अलिबाग द्वितीय क्रमांक सर्व विजेत्या खेळाडूंना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित पुंडे यांनी केले तर आभार तपस्वी गोंधळी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्याकरिता पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली