vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप; 300 खेळाडूंनी घेतले .क्रीडा व मानसिक विकासाचे धडे..

ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप; 300 खेळाडूंनी घेतले .क्रीडा व मानसिक विकासाचे धडे..

अमरावती, प्रतिनिधी: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती आणि एकविध खेळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 10 दिवसीय ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा 12 मे 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड येथे दिमाखात समारोप झाला. 2 ते 12 मे दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल (तपोवन चौक) व श्रीमती नरसम्मा महाविद्यालय (किरण नगर) येथे सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रांत हे शिबिर पार पडले. यात तब्बल 300 प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध खेळांचे कौशल्य आत्मसात केले.

या शिबिरात खेळाडूंच्या शारीरिक विकासासोबतच मानसिक स्वास्थ्यावरही विशेष भर देण्यात आला. स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट डॉ. तुषार आंबेडकर यांनी खेळाडूंना पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिले. योग व झुंबा शिक्षिका श्रीमती कविता शेंडे यांनी ध्यान व व्यायामाचे प्रात्यक्षिक घेतले, तर ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या सविता मोटवाणी यांनी खेळाडूंचे मन एकाग्र करण्याचे आणि पंचज्ञानेंद्रिये कार्यन्वित करण्याचे धडे दिले.

समारोप कार्यक्रमाला सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संजय अढाऊ, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, क्रीडा कार्यकारी अधिकारी ममता कोळमकर आणि राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू रोशन पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट सहाय्यक प्रशिक्षक व उत्कृष्ट खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. संजय अढाऊ यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत जास्तीत जास्त वेळ मैदानावर सराव करण्याचे आवाहन केले.

प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात क्रीडा विभागाच्या विविध योजना, 5 टक्के खेळाडू आरक्षण, क्रीडा गुण सवलत आणि ‘मिशन लक्षवेध’ याविषयी माहिती दिली. तसेच, मुलांनी आधुनिक मोबाईलच्या दुष्परिणामांपासून दूर राहून किमान एक तास मैदानावर घाम गाळावा आणि एका खेळाची निवड करून सराव करावा, असा सल्ला दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील चांदेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आशिष पाटील यांनी मानले.

******

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी १५-१६ एप्रिल रोजी निवड चाचणी..

राज्यस्तरीय शालेय रग्बी क्रीडा स्पर्धा 2025-26 ( 14 वर्षे मुले व मुली ..

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तर शालेय बॉक्सिंगचा स्पर्धेचा थरार 26 सप्टेंबर पासून

vishwatmaklokswamivarta

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇