vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेसाठी १० जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व महानगरपालिका, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२६-२७ या वर्षासाठी सुब्रतो मुखर्जी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा (सब-ज्युनियर व ज्युनियर) ग्रामीण जिल्हास्तरीय तसेच महानगरपालिका स्तरावर आयोजित करण्यात येत असून, पात्र शाळा, महाविद्यालयांनी आपल्या संघांची दि. १० जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी www.subrotocup.in/register या संकेतस्थळावर संघनोंदणी करणे आवश्यक असून, १५ वर्षांखालील खेळाडूंनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) मान्यताप्राप्त Selection Maturity Age Determination Test (SMADT) पूर्ण केलेली असावी. शाळांनी संघनोंदणी अर्ज व आवश्यक कागदपत्रे ahilyanagarsdo@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत. अर्जाची छायाप्रत संबंधित शाळेत जतन करून ठेवावी. स्पर्धेसाठी १५ वर्षांखालील (सब-ज्युनियर) मुलांचा जन्म १ जानेवारी २०१२ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा, तर १७ वर्षांखालील (ज्युनियर) मुला-मुलींचा जन्म १ जानेवारी २०१० रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सचिन राजपूत, क्रीडा मार्गदर्शक, जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर मो. ८०८७०७६६३३

 

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे प्रस्ताव 20 मेपर्यंत सादर करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 11 डिसेंबरला आयोजन प्रवेशासाठी 9 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत…

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*

समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय यशाकडे टप्पा*कॅरम व कुस्ती स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याचे वर्चस्व…

vishwatmaklokswamivarta

पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण