vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार खो-खो असोसिएशनची बैठक संपन्न; कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप

खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,खो-खो असोसिएशनची बैठक संपन्न; कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप..

पुणे, प्रतिनिधी: बदलत्या युगात नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे कामकाज पेपरलेस करण्याच्या उद्देशाने असोसिएशनच्या जिल्हा संघटकांसह तांत्रिक समितीला लॅपटॉपचे वितरण उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. खेळ आणि खेळाडूंच्या सन्मानासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव पाठीशी राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री श्रीमती पवार यांनी दिली.

या कार्यक्रमाला असोसिएशनच्या उपाध्यक्ष अश्विनी पाटील, सरचिटणीस डॉ. चंद्रकांत जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त जनार्दन शेळके, अर्जून पुरस्कार प्राप्त सुरेखा कुलकर्णी, श्रीरंग इनामदार उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, बदलत्या युगामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज बनली असून लॅपटॉपमुळे पेपरलेस कामकाजाला सुरुवात होईल. स्व. अजित दादांनी खो-खो खेळाच्या चौफेर प्रगतीसाठी अत्यंत तळमळीने प्रयत्न केले. त्यांच्याच संकल्पनेतून पेपरलेस कामकाजासाठी लॅपटॉप वितरण होत असल्याचे सांगितले

बारामतीत ऑक्टोबरमध्ये कै. भाई नेरुरकर चषक स्पर्धा ,कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची व प्रतिष्ठित खो-खो स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केली जाते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा बारामती येथे होणार असून स्पर्धेच्या अनुषंगाने असोसिएशनने तयारीला सुरुवात करावी,असेही त्या म्हणाल्या.

यावेळी असोसिएशन अंतर्गत अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, मुंबई, मुंबई उपनगर, नांदेड, नंदुरबार, पालघर, परभणी, पुणे, रत्नागिरी, रायगड, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे येथील सचिवांकडे लॅपटॉप सुपूर्द करण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

केंद्रीय योजनांच्या निधीचा परिपूर्ण विनियोग करण्यास प्राधान्य द्यावे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे ‘स्टॉकहोम कॉन्फरन्स’मध्ये आज भाषण स्वीडनमधील भारतीय समुदायासोबत संस्मरणीय संवाद

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

श्रीनारायण गुरूंच्या महासमाधी शताब्दी उत्सवाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन ,श्रीनारायण गुरूंचा एकतेचा संदेश आपल्याला आठवण करून देतो की सर्व मानवांमध्ये समान दिव्य तत्व आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू..

vishwatmaklokswamivarta

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

vishwatmaklokswamivarta