vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खंडाळा तालुक्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा छाननीबाबत खुलासा

खंडाळा तालुक्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचा छाननीबाबत खुलासा

सातारा प्रतिनिधी- दि. 23 जानेवारी रोजीच्या काही प्रसारमाध्यमांच्या बातमीमध्ये खंडाळा तालुक्यात छाननीमध्ये 30 अर्ज अवैध ठरवण्यात आले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हा परिषद/पंचायत समिती खंडाळा सार्वत्रिक निवडणूक 2026 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वस्तुस्थिती खुलासा केला आहे. खंडाळा तालुक्यामध्ये 3 गट व 6 गणामध्ये 93 उमेदवारांनी 122 अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये फक्त खेड बु. गणातील उमेदवार सविता बापुराव धायगुडे यांनी भरलेले 2 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. 92 उमेदवारांचे 120 अर्ज हे वैध ठरवण्यात आलेले आहेत.

अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारी अर्ज दाखल केले असून, वर नमूद उमेदवार वगळता इतर सर्व अर्ज वैध ठरले आहेत. तथापि वैध उमेदवारांची यादी जाहिर करत असताना एका पेक्षा जास्त अर्ज वैध ठरले असले तरी उमेदवाराचे नाव एकदाच दर्शवण्यात येते. तशी यादी प्रसिध्दीस देण्यात आली आहे. तरी या प्रकरणी वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रसिद्धी करण्यात यावी जेणेकरुन उमेदवार व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही, असे आवाहन जिल्हा परिषद/पंचायत समिती खंडाळा सार्वत्रिक निवडणूक 2026 सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले.

 

0000

संबंधित पोस्ट

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक*गणेशोत्सव ‘डीजे’मुक्त आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करा ! – हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट ड्रीम’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात मोबाईल मेडिकल युनिटचे उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते सत्कार

दहा डिसेंबर सकाळी एक वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक-मध्य रेल्वेने कल्याण आणि लोणावळा स्थानकांदरम्यान आवश्यक पायाभूत सुविधांच्या दुरुस्ती आणि जतनासाठी एक विशेष अभियांत्रिकी ब्लॉक जाहीर

vishwatmaklokswamivarta