vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा

       सांगली, प्रतिनिधी– सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय येथे सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी मोफत विशेष महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील 18 ते 50 वयोगटातील रोजगार इच्छुक युवतींनी/महिला उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, गणपती मंदिर रोड, नेमिनाथनगर, सांगली येथे सोमवार, दिनांक 23 मार्च, 2026 रोजी, सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणार आहे. या महिला रोजगार मेळाव्यामध्ये 300 पेक्षा अधिक पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील मिलेनियम मोटर्स, सांगली, क्रेडिट ॲसेस ग्रामीण लि. सांगली, एल.आय.सी ऑफ इंडिया, सांगली, सिध्दी व्हिल्स, मिरज, ॲक्सिस बँक, कोल्हापूर, अभिजीत रोकडे अँड असोसिएटस्‌, स्किल जॉब सर्व्हिसेस, सांगली, सह्याद्री मोटर्स प्रा. लि. सांगली, आयआयएफएल समस्त फायनान्स लि., जी. मेक फर्निचर इंडस्ट्रीज, कसबे डिग्रज, मुथुट मायक्रोफिन लि. आदि नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविलेला आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आय. टी. आय., डिप्लोमा, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट या प्रकारची शैक्षणिक पात्रता असणाऱ्या रोजगार इच्छुक महिला उमेदवारांसाठी विविध पदांकरिता उपस्थित उद्योजकांकडे प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी सोमवार, दिनांक 23 मार्च 2026 रोजी, प्रत्यक्ष मुलाखतीस येताना आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – ०२३३ २९९०३८३

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या

जुलै-ऑगस्ट मधील १९.२२ आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी१ हजार ३३९ कोटींच्या मदतीस मान्यता- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

नुतन वर्षानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल*नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या पुनर्वसनाबाबतचे प्रश्न सोडविणार – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

महाडीबीटी’ छाननीचे टप्पे कमी करून योजना गतिमान करावी- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta