vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या…

रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी ही सध्याची पदे रद्द करुन येत्या महिन्याभरात नवीन नियुक्तीची यादी जाहीर करण्याचा निर्णय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.सध्या जिल्ह्यात अस्तित्वात असणारी विशेष कार्यकारी अधिकारी रद्द करुन महिन्याभरात नवीन नियुक्त्या करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सध्या असणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असणारी शिक्के जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी विविध योजनांकरिता शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, राजापूर प्रांतांधिकारी विश्वजीत गाताडे, एमआयडीसी क्षेत्रिय अधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार राजाराम म्हात्रे, राजापूर तहसिलदार विकास गंबरे, लांजा तहलिदार प्रियांका ढोळे उपस्थित होते.

 

000

संबंधित पोस्ट

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक !सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव!… हा तर भारताला पुन्हा तेजस्वी बनवण्याचा आणि सनातन धर्माच्या पुनर्स्थापनेचा जागर! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते महारेशीम अभियानाची सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

कोजागिरी पोर्णिमा माहिती -, इतिहास आणि कथा शरद पोर्णिमा माता शबरी जन्मतिथी

सहेली महिला बचत गटाच्या वतीने पेढे वाटून डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी