vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यात अनधिकृत कत्तलखान्यातील गोहत्या बंदीसाठी विशेष मोहीम- गृहराज्यमंत्री योगेश कदम..

राज्यात अनधिकृत कत्तलखान्यातील गोहत्या बंदीसाठी विशेष मोहीम- गृहराज्यमंत्री योगेश कदम..

 

            मुंबई, प्रतिनिधी राज्यात कुठेही गोहत्या सहन केल्या जाणार नाही. यासंदर्भात शासन कठोर कारवाई करेल. राज्यात अनधिकृत कत्तलखान्यांत गोहत्या प्रकरणी अशा अनधिकृत कत्तलखान्यांवर विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.

गो हत्या बंदीबाबत सदस्य संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री अमोल खताळ, अतुल भातखळकर, असलम शेख, प्रवीण दटके यांनी सहभाग घेत उपप्रश्न उपस्थित केले.

गोहत्येचा गुन्हा वारंवार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याचे सांगत गृहराज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, गोहत्या गुन्हे वारंवार करणाऱ्या गुन्हेगारांना १० वर्षाची शिक्षा व दंडात वाढ करण्यासाठी सद्यस्थितीत असलेल्या कायद्यात सुधारणा करण्यात येईल. अशा गुन्हेगारांवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. गोरक्षक किंवा काही स्वयंसेवी संस्था गो हत्येची माहिती स्वतःहून पोलिसांना देतात. अशा प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. स्वयंसेवी संस्था, गोरक्षक आणि पोलिसांमध्ये समन्वय करण्यात येईल. तसेच गोरक्षकांना ओळखपत्र देण्याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल.

पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यात गोशाळा चालवण्यात येतात. यामध्ये वृद्ध, दुधाळ नसलेल्या, रस्त्यावरील जनावरांना ठेवण्यात येते. यासाठी शासन मदत करेल. बदलापूर (पश्चिम) येथे पोलिसांनी कारवाईत एका आरोपीस अटक करण्यात आली. इतर दोन आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील गोमांस सापडलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार हॉटेलचे परवाना रद्द करण्यात येईल, असेही गृहराज्यमंत्री श्री. कदम यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन कोकण आणि गोव्यासाठी विशेष रेल्वे गाडी…

vishwatmaklokswamivarta

भूमि अभिलेखकडील अर्धन्यायिक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी लोक अदालतीचे 26 सप्टेंबरला आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…

जालन्यात सावित्रीबाई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आमदार निधी देणार- आ. अर्जुनराव खोतकर महात्मा फुले यांचे विचार वर्तमान व भविष्यातही गरजेचे-संतोष खांडेकर

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…