vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

प्रियदर्शनी कॉलनीत सिमेंट रोड चे भूमिपूजन प्रभागाचा विकास जनतेच्या विश्वासातून – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना (प्रतिनिधी) : जालना संभाजीनगर परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील नागरिकांची दीर्घकाळची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. आज (दि. १७ ऑक्टोबर) रोजी विजू भदणेकर यांच्या घरापासून ते शांतीलाल हरदेकर यांच्या घरापर्यंतच्या सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमास नगरसेवक जिवन सले, भाजपा सरचिटणीस सुनिल पवार, चिटणीस सुभाष (मामा) सले, कल्याण भदणेकर, रोहित नलावडे, आकाश नखनव, गोविंद पवार, गणेश मालोदे, डॉ. भोंडवणे सर, महेश भोसले, आकाश नखनव यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भास्कर (आबा) दानवे म्हणाले भाजप सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक प्रभागाचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास असून, हा रस्ता काम जनतेच्या विश्वासातून साकार होत आहे.या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक सुलभ होईल, पावसाळ्यातील चिखल व अडथळ्यांपासून नागरिकांना दिलासा मिळेल.

संबंधित पोस्ट

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..

अतितीव्र दिव्यांग व्यक्तींनी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

एसटी महामंडळातर्फे विद्यार्थ्यांना मिळणार ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड;आधार संलग्न ‘सरल’ व ‘अपार’ क्रमांक अनिवार्य

मुंबईत १० कोटींचा गांजा जप्त – गुजरातमधील टोळीचा पर्दाफाश, दोन आरोपींना अटक: चुनाभट्टी पोलिस….