vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

सैनिक कल्याण पुणे विभागात माजी सैनिकांसाठी लिपिक-टंकलेखक पदांची भरती…

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी) – सैनिक कल्याण विभाग तसेच त्याच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांमध्ये लिपिक-टंकलेखक (गट–क) या एकूण ७२ पदांच्या भरतीसाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या पदांपैकी एक पद दिव्यांग संवर्गासाठी राखीव असून, किमान ४० टक्के दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांपैकी दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारी विचारात घेऊन, गुणवत्ता व उपलब्धतेनुसार नियुक्ती करण्यात येणार आहे.या भरती प्रक्रियेचे आयोजन टिसीएस–आयओएन (TCS–iON) या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकृत केले जाणार असून, इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

पात्र उमेदवारांनी आपले ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि.१४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दि.५ नोव्हेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर संकेतस्थळावरील लिंक बंद करण्यात येईल,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर – मंत्री नितेश राणे मुंबईतील सागरी वाहतूक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

vishwatmaklokswamivarta