vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना; विभागीय कार्यशाळा-संपूर्ण विभागात कालबद्ध कार्यक्रम राबवा- विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- शेतापर्यंत रस्त्यांची निर्मिती करणारा मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम आपल्या संपूर्ण विभागात कालबद्ध पद्धतीने राबवून येत्या पावसाळ्याच्या आत विभागात अनेक भागात शेतांपर्यंत रस्ते तयार व्हावेत या दृष्टीने नियोजन करावे,असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

 मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना हा कार्यक्रम राबविण्याबाबत व त्यासाठी सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत आज विभागीय कार्यशाळेचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, हिंगोलीचे विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच विभागातील सर्व भुमि अभिलेख अधीक्षक, उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.

 प्रास्ताविक जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. डॉ. अनंत गव्हाणे यांनी सादरीकरण करुन योजनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे झाल्याने ग्रामिण भागातील विकासाला गति मिळेल. शेत रस्त्यांबाबत तंटे, वाद कमी होण्यास वा संपुष्टात येण्यास मदत होईल. हे काम राबवितांना त्याचे टप्पे करावे व प्रत्येक टप्प्यावर कालबद्ध कृती करुन रस्ते तयार करण्याचे काम सुरु करावे. जेणेकरुन येत्या पावसाळ्यापर्यंत विभागात अनेक ठिकाणी रस्ते मोकळे व तयार झाले पाहिजे.

श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

०००००

संबंधित पोस्ट

रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती उपक्रमाचीसांगली अपर तहसीलदार कार्यालयामार्फत प्रभावी अंमलबजावणी 194 पाणंद रस्त्यांच्या नोंदी, 350 शिवार रस्त्यांचे सर्वेक्षण, 2210 जातीचे दाखले वाटप

राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्रातील संजीवनी सैनिक स्कूल आणि डॉन बॉस्को हायस्कूलची निवड

vishwatmaklokswamivarta

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

vishwatmaklokswamivarta

प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील १४ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार