vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करणे बंधनकारक

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी

ज्या आस्थापनांवर २५ किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापनांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत आपल्याकडील मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

 या आस्थापनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/ व्यवसाय/ महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद / पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांचा समावेश होतो. अशा आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणरपत्र नमुना ई-आर १ तिमाही संपल्यानंतर म्हणजेच डिसेंबर – २०२५ अखेर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार विवरणपत्र दि. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सादर करावे.

विवरणपत्र ऑनलाईन कसे सादर कराल?

यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ई-आर रिपोर्ट मधील ई-आर १ या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

 यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत या कार्यालयाच्या (०२४०) २९५४८५९ दूरध्वनीवर संपर्क साधावा.

विवरणपत्र सादर न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

विकसित भारत रोजगार आणि आजिविका हमी मिशन (ग्रामीण) योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक– रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

जागतिक पर्यावरण दिन विशेष पोफळेकरांचे ‘सुर्याय नमः’‘पोफळा’ ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम..

पैशांअभावी एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही – आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर मुरूम येथे मतदारसंघस्तरीय ‘मुख्यमंत्री समुदाय आरोग्य शिबीर

vishwatmaklokswamivarta

मुरघास संयंत्र वाटप योजना : पशुपालकांना उद्योजक होण्याची सुवर्णसंधी