vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम-रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

 

जालना, प्रतिनिधी :- जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा रविवार दि.23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत त्यांच्या गावच्या शाळेतील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी केले आहे.

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत परीक्षा ही ऑफलाईन पध्दतीने होणार असून प्रश्नपत्रिका 150 गुणांची असणार आहे. यात वाचन 50 गुण, शब्दलेखन 50 गुण आणि संख्यात्मक ज्ञानासाठी 50 गुण अशी गुणांची विभागणी करण्यात आली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 51 गुण आवश्यक आहेत. उमेदवारांना परीक्षेसाठी निळा व काळा शाईचा पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात परीक्षेसाठी एकुण 970 परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत. परीक्षेत दिव्यांग उमेदवारांना 60 मिनिटांचा वेळ अधिकचा देण्यात येणार आहे. असे शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेजच्या नूतन इमारतीचा 14 मे रोजी भूमिपूजन

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! हिंदु जनजागृती समिती*आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?

राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी १ लाख ८० हजार ५७४ शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाख रुपयांची #मदत देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वे तिकीटासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात दोन अतिरिक्त खिडक्या- खासदार नरेश म्हस्के यांचे प्रवासी संघटनेने मानले आभार