vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

           जालना, प्रतिनिधी) :- जिल्ह्यात आगामी गुढीपाडवा, रमजान ईद आणि श्रीरामनवमी या सण, उत्सवात शहरातील मिरवणुका व विविध कार्यक्रम आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.3 एप्रिल 2025 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

   संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 21 मार्च रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 3 एप्रिल 2025 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे· मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

श्रीम.विजया चामे यांचे रस्ता सुरक्षा दूत म्हणून अत्यंत कौतुकास्पद कार्य

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा १३४ वा भाग; समाज घडवणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे दर्शन

जात प्रमाणपत्र पडताळणी करून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक नुकसान टाळावे-मेघराज भाते               

vishwatmaklokswamivarta