vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा, प्रतिनिधी: सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पर्यटन विकास आराखड्यातील कामे येत्या सप्टेंबर अखेर सुरु करावेत. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती कामे येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करावी. तसेच जी कामे सुरु करावयाची आहे ती कामे माहे मे पर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात विविध पर्यटन विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी घेतला. या आढावा बैठकीला उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, कार्यकारी अभियंता श्रीपात जाधव, राहूल अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पर्यटन विकास कामांचा आढावा घेतला जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कामांसाठी ज्या ज्या विभागाचे ना हकरत प्रमाणपत्र घ्यावयाचे आहे त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. काही कामांमध्ये अडचणी येत आहे या अडचणी दूर करण्यासाठी काम घेतलेल्या एजन्सीसोबत संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर भेट देऊन अडचणी दूर कराव्यात.

अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन, संवर्धन, पसिराच्या सुशोभीकरण व पायाभूत सुविधेचा आराखडा, संगम माहुली व क्षेत्र माहुली येथील सुशोभीकरणाचा आराखडा, तळबीड ता. कराड येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्य सृष्टी आराखडा व कराड येथील प्रितीसंगम सुशोभीकरणाचा आखडा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पाहून येथील आरखड्याच्या कामांचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

0000

संबंधित पोस्ट

१९६२ कॉल सेंटर’ व मोबाईल वेटरनरी क्लिनीक यांच्या समन्वयामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचे अर्ज स्विकारण्यास दि.29 सप्टेंबर पर्यंत मुमुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत,सांगली जिल्हा राज्यात अव्वल- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान*जिल्ह्यात आचारसंहिता लागू

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी महिला नागरी सहकारी पतसंस्थांची नोंदणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

vishwatmaklokswamivarta