vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

नांदेड, प्रतिनिधी :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 च्या कलम 83 व 88 अन्वये सहकारी संस्थांच्या चौकशीसाठी प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्यात येत आहे. यासाठी सहकार खात्यातून निवृत्त झालेले (वय 70 वर्षे पूर्ण न झालेले) अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, वकील तसेच सनदी लेखापाल यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर विभाग, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, लातूर येथे तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, लातूर/धाराशिव/बीड/नांदेड व संबंधित जिल्ह्यांतील सर्व उपनिबंधक व सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध आहेत.

हे अर्ज 01 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्राप्त होऊ शकतात. संबंधित पात्र व्यक्तींनी परिपूर्ण अर्ज आवश्यक कागदपत्रांसह विहित मुदतीत संबंधित कार्यालयात सादर करावेत.

याबाबतची सविस्तर सूचना संबंधित कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे आवाहन प्रवीण फडणवीस, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातूर यांनी केले आहे.

००००००

संबंधित पोस्ट

सामाजिक ऋण चुकविण्याचा रायगड डाक विभागाचा अनोखा पायंडा

नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीच्या लेकींकडून “सावित्रीमाई फुले” यांना जयंती निमित्त अभिवादन…

आजपासून वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची !मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम…

vishwatmaklokswamivarta

सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी

कामात हलगर्जी करणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी घेतले फैलावर भाईंदर आणि मिरारोड स्थानकाच्या सोयीसुविधांसाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या सूचना…

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रीवर निर्बंध; औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम

vishwatmaklokswamivarta