vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

 

अमरावती, प्रतिनिधी): अमरावती शहरात श्री क्षेत्र चांगापूर हनुमान मंदीर, चांगापूर अमरावती येथे दरवर्षी प्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भावीकांची गर्दी असते. दि. 02 एप्रिल 2026 गुरूवार, सकाळी 5 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

सर्व वाहनांना वाहतूकीसाठी बंद करण्यात येणारे मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर हा मार्ग सर्व प्रकारच्या जड वाहनांकरीता प्रवेश बंदी राहील.वाहतूकीस पर्यायी मार्ग चांगापूर फाटा ते श्री हनुमान मंदीर चांगापूर रेल्वे अंडर बायपास या मार्गे फक्त दर्शनाकरीता जाणार दुचाकी, चारचाकी वाहनांना प्रवेश राहील. हनुमान मंदीर चांगापूर येथे दर्शन घेवून परतणाऱ्या नागरिकांनी आपल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी मंदीरा पासून बाहेर निघणार मार्ग- अयोध्या नगरी ले-आऊट ते रेवसा फाटा या मार्गाचा अवलंब करावा. पार्कीग व्यवस्था- मंदीर परिसरात वाहन पार्कींग फलक लावले असल्या त्याच ठिकाणीच वाहन धारकांनी वाहने पार्क करावे.

वाहतूक परिस्थितीनुसार वाहतूक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतूक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता सहायक पोलीस आयुक्त वाहतुक अमरावती शहर यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतूकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करण्याचे अधिकार राहील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

vishwatmaklokswamivarta

अमृत’ लक्ष्यीत गटातील उमेदवारांसाठी दि.३ पासून आयात-निर्यात प्रशिक्षण

वेरुळ येथील ज्योतिर्लिंग घ्रुष्णेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा-महाशिवरात्र यात्रा; वाहतुक मार्गात बदल

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करताना आचारसंहिता नियमांचे पालन करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखीपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

टी-२० विश्वचषक फायनल: १०,००० कोटींच्या सट्टेबाजी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा ! – सुराज्य अभियानाचे नागपूर व गोवा येथील तक्रारींना समर्थन*