vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

 

मुंबई, प्रतिनिधी: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आदरणीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला आहे. अजितदादांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला आहे, अशा शब्दात कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहे.

 

 शोक संदेशात कामगार मंत्री म्हणाले, अजितदादा म्हणजे कामाचा प्रचंड उरक आणि प्रशासनावर दरारा असलेले व्यक्तिमत्त्व. ‘शब्दाला पक्का नेता’ ही त्यांची ओळख संपूर्ण राज्याला होती. पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा आणि रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामे मार्गी लावणारा लोकनेता आपण गमावला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरले आहेत.

मी कामगार मंत्री म्हणून काम करत असताना, अनेकदा त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. प्रशासकीय कामातली त्यांची स्पष्टता आणि वेळेचे नियोजन नेहमीच थक्क करणारे असायचे. कामात कसलीही दिरंगाई त्यांना खपत नसे. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळेच राज्याच्या विकासकामांना नेहमी गती मिळाली. संपूर्ण राज्याला विकासाची नवी दृष्टी देणारे दादा आज आपल्यात नाहीत, यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यांची उणीव सदैव भासत राहील.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो आणि पवार कुटुंबीय तसेच त्यांच्या लाखो समर्थकांना हे अतीव दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना, असेही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

फाळणी दुःखद स्मृती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित प्रदर्शनाचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन

विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा*

आंबेडकर जयंती निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्काराबाबत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ*

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· दैनंदिन बैठका, उद्दिष्टनिश्चिती, नव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प..

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

vishwatmaklokswamivarta