vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले.

राज्य प्रतिनिधी-दिव्यांगांप्रती सन्मान आवश्यक आहे. दिव्यांगासाठी आता स्वतंत्र विभागाची स्थापना झाली असल्याने त्यांना मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ सुलभ होण्यास मदत झाली असून जिल्हा प्रशासन दिव्यांगांना सक्षम बनविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी मंगळवारी केले.

जिल्हा प्रशासन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात झालेल्या दिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीराम देशपांडे, डॉ. राजेश पाटील, डॉ. योगेश निटुरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे म्हणाल्या, ही कार्यशाळा जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची असून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेमुळे कायदेशीर अधिकार सर्वांना परिचित होवून जनजागृती होण्यास मदत होणार आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही दिव्यांगाप्रती संवेदनशीलतेने काम करून आपली जबाबदारी पार पाडावी. दिव्यांगांसाठीच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

संबंधित पोस्ट

मयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत दर्जेदार कामे करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांकडून बारामती तालुक्यातील विकासकामांची पाहणी

एपीटी ॲप्लिकेशन प्रणालीसाठी आज पोस्टल व्यवहार बंद

बुलढाण्यात 1 ऑगस्टपासून स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र सुरू;व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी ऑनलाइन वेळ आरक्षित करण्याचे आवाहन

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवसमूह पुनर्विकास करावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा कारागृहात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta