vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवजयंतीचे औचित्य साधून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न

शिवजयंतीचे औचित्य साधून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न

ठाणे, प्रतिनिधी:- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार मृद व जलसंधारण विभागामार्फत दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यामधील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन गाव तलाव, गावतळे व पाणी पुरवण्यासाठी वापरले जाणारे सध्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणीसाठ्यात वाढ करण्याची मोहीम सुरु करण्यात आली. ग्रामपंचायत अथवा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यात कमीत-कमी एक अथवा मतदारसंघनिहाय एक तलाव घेऊन शिवजयंतीच्या दिवशी काम सुरु करण्याबाबतचे निर्देश प्रत्येक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना देण्यात आले होते.

त्यानुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील कळमगाव खरमेपाडा सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच, लोकसहभागातून पालघर जिल्ह्यातील सावरे एंबूर येथील पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहीम सुरु करण्यात आली. तसेच, पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात अणवीर येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शिवजयंतीचे औचित्य साधून विन्हेरे लघु पाटबंधारे तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातीलराजेवाडी लघु पाटबंधारे तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील जानवली लघु पाटबंधारे तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सूचनेनुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत 100 दिवसात राज्यातील तलावातून जास्तीत जास्त गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यामुळे धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात दि.१५ व १६ रोजीव्यसनमुक्तीचा जागर; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते-कल्याणकारी योजनांच्या ‍चित्ररथाचे उद्‌घाटन

सोयाबीन, कापूस, संत्राचे तत्काळ पंचनामे करावेत  – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

जालना रेल्वे स्थानकावर अनधिकृत सजावट प्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा