vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण..

ठाणे, प्रतिनिधी- पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 कालावधीतील 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.15 वा. ते 2.30 वा. या कालावधीत भागलपूर, बिहार येथील समारंभात वितरित होणार आहेत. हा कार्यक्रम देशामध्ये “किसान सन्मान समारोह” म्हणून सर्वदूर आयोजित करण्यात आलेला आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी. एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरु केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रति वर्षी रू.6 हजार त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत आहे. पी. एम. किसान योजनेंतर्गत राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना यापूर्वी एकूण 18 हप्त्यांमध्ये सुमारे रु.33 हजार 565 कोटीचा लाभ जमा झालेला आहे.

पी.एम. किसान योजनेच्या लाभासाठी केंद्र शासनाने लाभार्थीने भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधार संलग्न करणे, ई-केवायसी प्रमाणिकरण करणे या बाबी बंधनकारक केलेल्या आहेत. राज्यातील सद्य:स्थितीत या तीनही बाबींची पूर्तता केलेल्या एकूण 12.89 लाख शेतकरी कुटुंबांना दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी सुमारे रक्कम रुपये 1 हजार 967 कोटीहून अधिक रक्कमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे. राज्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर हा समारोह आयोजित करण्यात येत आहे.

या समारंभाच्या वेळी प्रगतशील शेतकरी कृषी शास्त्रज्ञ, निमंत्रित मान्यवर, तसेच शेतकरी यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, प्रदर्शने, विविध योजनांची माहिती व लाभ वितरण इ. कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. राज्यात वेगाने सुरु असलेल्या अग्रीस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी माहिती संच तथा फार्मर आयडी बनविण्यासाठीची नोंदणी नागरी सुविधा केंद्रांवरुन करण्यात येत आहे. या ठिकाणांवरुनही या समारोहाचे थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होता येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे या समारोहास सातारा येथून सहभागी होणार आहेत. विविध राज्यांमधील कृषी विभाग, महसूल व वने विभाग, ग्राम विकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने हा समारोह साजरा करण्यात येणार आहे. या समारोहाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंक वरून होणार आहे. या लिंकचा वापर करून राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु भगिनींनी या समारोहामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य, पुणे कृषी आयुक्तालय, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

माओवाद विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश-किमान तीन वर्षे सी-६० मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पर्यावरण संवर्धनासाठी कमी कार्बन उत्सर्जनवर भर द्यावा.- माहिती तंत्रज्ञान मंत्री, ॲड. आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta

2 डिसेंबर भोपाळ दुर्घटना दिन/राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन…

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा शुभारंभ-पुणे विभागात विविध कार्यक्रमाचे आयोजन; अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा -प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे

घर घर संविधान’;उद्या(दि.२६) संविधान जाणीव जागृती रॅली

vishwatmaklokswamivarta