vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईत 27 व 28 मार्च रोजी वैद्यकीय परिषद ‘पल्स’ चे आयोजन’पल्स’ परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला ओळख निर्माण करून देणाऱ्या ‘पल्स’ या वैद्यकीय परिषदेचे आयोजन मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर, येथे २७ व २८ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे. या परिषदेत देशातून आणि जगभरातून वैद्यक क्षेत्रातील २९०० पेक्षा जास्त तज्ज्ञ, अभ्यासक आणि मान्यवर सहभागी होणार आहेत.

‘पल्स’ वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून परिषदेच्या माध्यमातून ‘वेलनेस’ उपचारांचा वैद्यकीय पर्यटनातील ‘महाराष्ट्र ब्रँड’ निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी परिषद आयोजनाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.पारंपरिक खर्चिक असलेल्या वैद्यकीय उपचाराऐवजी ‘वेलनेस’ उपचारांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. ‘वेलनेस’ उपचार पद्धतीत राज्यात मोठ्या प्रमाणावर वाव आहे. त्यामुळे आयुषमधील उपचार पद्धतींना ‘वेलनेस’ कडे वळविण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक स्टार्टअप कार्यरत आहेत. अधिकाधिक स्टार्टअपला परिषदेत सहभागी करून घ्यावे. जेणेकरून परिषदेमध्ये या क्षेत्रात होणाऱ्या नवनवीन संशोधनावर आधारित चर्चांमधून कर्करोगासारख्या आजारांवर सहज, सोपी आणि परवडणारी उपचार पद्धती विकसित करण्यात स्टार्टअपला मदत होईल.वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदार या परिषदेत सहभागी होतील याबाबत दक्षता घ्यावी, त्यांच्या माध्यमातून राज्यात होत असलेल्या ‘बल्क ड्रग पार्क’ मध्ये गुंतवणूक होईल, यासाठी प्रयत्न करावे. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागांनी नोडल अधिकारी नियुक्त करावेत. सबंधित विभागांनी समन्वयाने काम करीत परिषदेच्या आयोजनातून राज्याला वैद्यकीय क्षेत्रात मोठा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी परिषदेत वैद्यक क्षेत्रातील गुंतवणूकदारांसोबत करार करण्यात यावेत. यामधून ग्रामीण भागात आरोग्याच्या दर्जेदार सुविधा निर्माण होतील. मानसिक आजारांवरील नवनवीन उपचार पद्धती, वैद्यकीय पर्यटन विकसित होण्यासाठी परिषदेच्या संधीचा उपयोग करण्यात यावा.

बैठकीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्रीधर दुबे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्री यांच्या सल्लागार पूजा मिसाळ आदी उपस्थित होते.

अशी असणार परिषद

रिषदेचे उद्घाटन 27 मार्च रोजी होईल. परिषदेत प्लेनरी, 360 डिग्री डोम, आदींसह स्टार्टअपसाठी वेगळी दालने असणार आहेत. तसेच उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधनाची माहिती असणारी दालने असणार आहेत.

परिषदेत जागतिक आरोग्य संघटना, युनेस्को यांचे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी होतील. जगातील नामांकित वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि संशोधकही परिषदेत सहभाग घेणार आहेत. भविष्यातील वैद्यकीय शिक्षण, डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, उपचार पद्धतीतील संशोधन या विषयांवर पॅनल चर्चा, कार्यशाळा आणि केस स्टडीज होणार आहेत.तसेच प्रदर्शन, राऊंड टेबल चर्चा, ‘टेक टॉक’ असणार आहे.

संबंधित पोस्ट

भिवंडीत ‘मिथेनॉल’चा मोठा साठा जप्त; आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार एफडीएची धडक कारवाई

राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

जालना पाटबंधारे विभागाचा कडक इशारा-पाणीपट्टी न भरल्यास पाणी व वीज पुरवठा खंडित करणार